प्रातः सोपस्कार / MORNING RITUALS
प्रातः सोपस्कार
"लवकर निजे, लवकर उठे त्यासी आरोग्यम् धनसंपदा लाभे !"
अशी शिकवण आपल्याला बालपणापासूनच मिळालेली आहे.
मनुष्य जीवनात बर्याच प्रकारच्या संपत्ती असतात जसे की मानसिक संपत्ती, शारीरिक संपत्ती, आर्थिक संपत्ती, ऐहिक संपत्ती, भौतिक संपत्ती, आध्यात्मिक संपत्ती...
पण जाणकारांच्या मते, ह्या सर्वांमधील महत्त्वपूर्ण संपत्ती म्हणजे शारीरिक संपत्ती !
मानवी शरीर हे जीवन जगण्याचे एक माध्यम आहे.
ते एका यंत्रा सारखे काम करते, जर त्याची मशागत वेळच्या वेळी केली तर त्याची कार्यक्षमता टिकून राहते.
मानवी शरीर कार्यक्षम राहण्यासाठी योग्य व्यायाम, उत्तम आहार, पुरेशी विश्रांती आणि चांगली जपणूक अत्यंत आवश्यक आहे.
दिवसभरात कामे झाल्यावर आपले शरीर झिजते, ती झीज भरुन काढण्यासाठी आपल्याला विश्रांतीची गरज असते.
आयुर्वेदातील माहितीनुसार, शरीराची झीज भरुन काढण्यासाठी सलग ४ तासांची झोप आवश्यक असते.
सध्याच्या काळात अति काम, अपार कष्ट, एका वेळेस अनेक कामे करणे आणि योग्य, पोषक आहार यांची कमतरता ह्या गोष्टींमुळे झोप घेण्याची वेळ ६ ते ८ तास असावी असे सांगितली जाते.
तसेच दुपारी न झोपता रात्रीची पूर्ण वेळ झोप असावी.
विशेषत्वाने रात्री ११:३० ते पहाटे ४:३० ह्या वेळेतील झोप ही सर्वोत्तम असे सांगितले आहे.
पहाटे (पूर्ण झोप घेऊन) ४ ते ६ ह्या वेळेमधे केव्हाही उठल्यास आणि योगासने, रागदारी किंवा सकारात्मक विचारांचे मनन केल्यास ते तात्काळ फळते असे म्हणतात.
त्यामागे शास्त्रीय कारण असे की, ह्या वेळेत झाडांपासून जास्तीत जास्त प्राणवायू उत्सर्जित होत असतो, हवा शुद्ध असते, वातावरण शांत आणि थंडगार असते, उगवत्या सूर्याची किरणे हवेतील दूषित वायू, कण नष्ट करत असतात. त्यामुळे वातावरणात प्रचंड सकारात्मकता, ऊर्जा असते आणि आपले सहस्रार चक्र कार्यान्वित झालेले असते. याच कारणामुळे पहाटेची स्वप्ने खरी होतात असेही म्हंटले जाते.
ह्या प्रहरास ब्रम्ह मुहुर्त असेही म्हणतात कारण निसर्ग/देवता/शक्ती यांचा पृथ्वीतलावर प्रचंड वावर असतो.
म्हणून आपण जे विचार ह्या वेळेत करतो ते निसर्गापर्यंत जलद पोहोचतात आणि आपण हवे ते मिळवू शकतो.
तसेच ह्या वेळेत उठल्याने अर्थात सूर्योदयापूर्वी उठल्याने शरीरातील प्रत्येक अवयव हा योग्यरित्या कार्यान्वित होतो त्यामुळे आरोग्य उत्तम राहते.
माझ्या वाचण्यात, ऐकण्यात ज्या ज्या यशोगाथा आल्या, ज्यांनी यशाची, कीर्तीची उत्तुंग शिखरे गाठली, त्याप्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे तत्त्व म्हणजे "प्रातः सोपस्कार."
त्या प्रत्येक व्यक्तीने हेच अनुभव कथित केले आहेत की, शरीराची झीज भरुन काढण्यापूर्ती झोप घेणे आणि दिवसाची सुरुवात शक्य तितक्या लवकर करणे ही भव्य यश संपादन करण्याची गुरुकिल्ली आहे.
त्यामुळे आपली कल्पनाशक्ती, मानसिकता, ऊर्जा आणि स्वतःवरची विश्वासार्हता ही कायमच उत्तेजित राहते.
🙏
ह्याच बहूगुणांमुळे मी व माझे सहकारी पहाटे उठून,
ध्यानधारणा (meditation), त्यानंतर अनुमोदन (affirmations) आणि अंती कल्पनाचित्रण (visualization) अशा प्रभावशाली कृती करुन दिवसाची सुरुवात करतो.
तुम्हीही अशाच पद्धतीने अनुसरण करुन त्या नैसर्गिक शक्तीची अनुभूती घेऊ शकता, जी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हास अत्यंत उपयुक्त ठरेल.
आम्ही आमच्या अधिकृत संकेतस्थळावर अनेक सेवा पुरवतो जसे की व्यक्तीमत्व ओळख, उपयुक्त पुस्तकांचे वाचन, व्यापार वृद्धीसाठी विविध तंत्र, तंत्रज्ञान आणि व्यवसायाची सांगड घालण्याचे मार्ग इत्यादी.
प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात, अनेक प्रसंगी ह्या सर्व सेवांचा फायदाच होईल ही आमची खात्रीलायक वचनबद्धता पाळण्यावर आमचा कायम भर असतो.
👉 अशाच अनेक गोष्टींबाबतीत समविचारी लोकांकडून मार्गदर्शन व त्यांच्यासोबत संघटित होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करु शकता तसेच आमच्या मोफत तसेच सशुल्क सेवांचा लाभही घेऊ शकता :
संयमपूर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद...👍😃
------------------------------ ------------------------------ - X ------------------------------ -----------------------------
MORNING RITUALS
We have been taught from our childhood that
"sleep early, wake up early, gain good health with plenty of wealth."
There are many types of wealth in human life such as mental wealth, physical wealth, financial wealth, worldly wealth, materialistic wealth, spiritual wealth...
But according to the experts, the most important wealth in all of these is Physical wealth!
The human body is a means of living.
It works like a machine, if it is cultivated on time, its efficiency is maintained.
Proper exercise, a good diet, adequate rest, and good nutrition are essential for the human body to remain functional.
After the day's work, our body deteriorates. We need rest to replenish that deterioration.
According to Ayurveda, 4 hours of continuous sleep is necessary to replenish the deterioration of the body.
Nowadays, due to overwork, immense hardship, multi-tasking, and lack of proper, nutritious food, it is advised that the sleeping time should be 6 to 8 hours a day.
Also, sleep should be full time at night without sleeping in the afternoon.
It is especially said that sleeping between 11:30 pm and 4:30 am is the best.
It is said that if you wake up in the morning (with full sleep) between 4 to 6 and do yoga, ragdari, or meditate on positive thoughts, it gives immediate results.
The scientific reason behind it is that during this time the maximum amount of oxygen is getting emitted from the trees, the air is pure, the atmosphere is calm and cool, and the rays of the rising sun are destroying the polluted gases and particles in the air. So the atmosphere is full of positivity and energy, and our Sahasrara chakra is activated at that time. It is also said that early morning dreams come true due to these reasons.
This Prahra is also called Brahma Muhurta because nature/deity/energy has great movement on earth.
So the thoughts we think about during this time reach nature faster and we can get what we want.
Also, by waking up at this time, i.e. waking up before sunrise, every organ in the body functions properly, thus maintaining good health.
From the success stories that I have read and heard, those who have reached the heights of success and fame, the most important element of each of their life is "Morning rituals."
Each of them has reported the same experience that getting enough sleep to replenish the body and starting the day as early as possible is the key to achieving great success.
So our imagination, mindset, energy, and self-confidence are always stimulated.
🙏
Because of these qualities, I and my colleagues wake up early in the morning.
Start the day with effective actions such as meditation, followed by affirmations, and finally visualization.
You too can follow the same method and experience that natural power, which will be very helpful for you to reach your goals.
We provide many services on our official website like personal branding, reading useful books, various techniques for business growth, ways to collaborate technology with business, etc.
We always focus on our unwavering commitment that everyone will surely receive benefits from these services in one way or the other, on many occasions.
👉 To get guidance and collaboration with like-minded people on many such things, also to avail of our free as well as paid services, click and visit the link below :
Thanks for reading patiently...👍😃
3 comments
Nice and very informative ....
Good and informative post
Fantastic 👍
Post a Comment