Updates

E.N.T.R.E.P.R.E.N.E.U.R. / उ.द्यो.ज.क.

 





E.N.T.R.E.P.R.E.N.E.U.R.



Hello everyone,
I attended a mentoring seminar on "Entrepreneurial Skills and Development".
Speaker mentioned small little things very nicely.
The speaker explained the term entrepreneur very well, as -

EN             ENdless ideas
TRE          TREmendous vision
PRE           PREplanning
NE             NEgligence of problems
UR             URgency in taking actions

After the seminar, on my way home, I noticed a boy.
I was very curious, so I casually approached him.
When we had a conversation, I felt quite surprised and equally great.

He was 19 years old only.
When I asked him the reason for attending the seminar, I found a Marathi saying to be true which is stated as - 
The baby's feet are seen in the cradle
which means -
"Baby's vision is seen in his childhood."

I asked him a simple question,
- Who is an Entrepreneur or what is your opinion about it...?
He answered me very freely, very heartily.
As -

*Entrepreneur*
- Is an individual who always uses creativity in an innovative way to generate productive outcomes.
He creates his own ideas & always be a leader in the market. He is intuitive in nature, and always dares to take risks.
- He always finds people-oriented ideas. He gives more importance to employees, customers, and the public. He always creates a market for his own business.
- His approach toward life is very different than others. He has long-term, big goals but he always takes baby steps to reach over there, as he believes in taking 1 strong and firm step at a time.

The boy further said -

- According to me, an entrepreneur can be described as :
E - Enthusiasm
N - Never give up attitude
T - Teamwork
R - Realistic goals
E - Encouragement
P - Passion
R - Responsibility
E - Energy
N - no Negativity
E - Enhancement
U - Urgency of work
R - Rock-solid belief

- He is a great source of a never giving up attitude.
He has a plan to generate passive income even after he is working or not, but he always takes care of his teammates & teaches them how to build their empire while working with him to earn huge money.

- He always thinks in a different way. He believes in enhancing his people's lifestyle so that they can be loyal to their work & achieve great success.

- He never has an approach of giving 100% of himself, he always focuses on putting the full 1% of every teammate with discipline & dedication.

- He knows how to prioritize things & how to guide people about it.
He can become a businessman afterward but a businessman can never be an entrepreneur as he uses an old, conventional idea to do the business.

- In my opinion, every individual has entrepreneurial skills by birth. Family culture, background, the income of the family, educational qualification, the mindset of family members, compatibility, etc these things matter in everyone's life.
But in the end, one brave decision can change life irrespective of all of the above-mentioned things.

- A good thought, association with a great person, and readiness to dare is the key to becoming a good entrepreneur.

A right decision, for the right purpose, with the right person at right time can change everything in someone's life who wants to be an entrepreneur.


My teammates and I are on a journey to become versatile entrepreneurs.

We provide excellent guidance to many such aspirants who come to us. Based on our studies, knowledge, and experiences, we teach them different ways, values, and methods of doing business and help them to become excellent entrepreneurs.

If you are also like-minded or if you are interested in writing and podcasting or looking for various entrepreneurial ideas, and partners, then feel free to contact us.

To contact, please visit the following websites -
👉 Telegram:


😎😎😎

-------------------------------------------------------------  X  ----------------------------------------------------------


उ.द्यो.ज.क.


नमस्कार,
मी एका "उद्योजकता कौशल्य व विकास" ह्या विषयावरील मार्गदर्शनपर परिसंवादास उपस्थित होतो.
खूप छान आणि छोट्या छोट्या गोष्टी वक्त्यांनी नमूद केल्या होत्या.
वक्त्यांनी उद्योजकाची संज्ञा खूपच छान प्रकारे सांगितली -

उ    -      उदारमतवादी
द्यो   -      द्योतक विचारांचा
ज    -      जतन करणारा (स्वप्नांचे)
क    -      कल्पनाशक्ती भक्कम असलेला

परिसंवाद संपल्यानंतर घरी निघताना माझी नजर एका मुलाकडे गेली.
मला त्याच्याबद्दल खूप कुतूहल वाटले, म्हणून मी सहज त्याच्याकडे गेलो.
जेव्हा आमचे संभाषण झाले, मला खूपच आश्चर्य आणि तितकेच विलक्षणही वाटले.

त्याचे वय फक्त १९ वर्षे होते.
त्याला जेव्हा परिसंवादासाठी हजर राहण्याचे कारण मी विचारले तेव्हा 
"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात"
ह्या उक्तीची सत्यता पटली.

त्याला मी एक साधा प्रश्न विचारला होता की,
- उद्योजक म्हणजे काय किंवा त्याबद्दल तुला काय कल्पना आहे...?
त्याने मला अगदी मनमोकळे, अगदी दिलखुलासपणे उत्तर दिले.
ते असे की,

उद्योजक 
- एक अशी व्यक्ती आहे जी उत्पादकीय परिणाम निर्माण करण्यासाठी नेहमीच सर्जनशीलतेचा वापर नाविन्यपूर्ण मार्गाने करते.
तो स्वतःच्या कल्पना तयार करतो आणि बाजारात कायम अग्रेसर राहतो. तो स्वभावाने दूरचा विचार करणारा असतो आणि नेहमी जोखीम घेण्याचे धाडस करतो.
- तो नेहमी लोकाभिमुख कल्पना शोधतो. तो कर्मचाऱ्यांना, सहकाऱ्यांना आणि ग्राहकांना अधिक महत्त्व देतो.
- त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा खूप वेगळा असतो. त्याच्याकडे दीर्घकालीन, मोठी उद्दिष्टे असतात परंतु तेथे पोहोचण्यासाठी तो नेहमीच लहान पावले उचलतो, कारण त्याला एकावेळेस एकदाच पण मजबूत पुढाकार घेण्यावर विश्वास असतो.

तो मुलगा पुढे म्हणाला :

- माझ्या मते, उद्योजकाचे असे वर्णन केले जाऊ शकते :
E    -    उत्साह
N    -    हार न मानण्याची वृत्ती
T    -   सामूहिक कार्य
R    -    वास्तववादी ध्येये
E    -    प्रोत्साहन
P     -   आवड
R    -    जबाबदारी
E    -    ऊर्जा
N    -    विनानकारात्मकता
E    -    सुधारणा
U    -    तत्परता
R    -    ठोस विश्वास

- कधीही न हार मानणाऱ्या वृत्तीचा तो एक उत्तम स्रोत आहे.
मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवण्याची त्याची योजना असते, मग तो काम करत असो किंवा नसो. परंतु तो नेहमी आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेतो आणि प्रचंड पैसा मिळवण्याबरोबरच, त्यांचे साम्राज्य कसे निर्माण करायचे ते त्यांना शिकवतो.

- तो नेहमी वेगळ्या पद्धतीने विचार करतो. आपल्या लोकांची जीवनशैली सुधारण्यावर त्याचा विश्वास असतो जेणेकरून ते त्यांच्या कामाशी एकनिष्ठ राहू शकतील आणि भव्य यश मिळवू शकतील.

- स्वतःचे १००% देण्याचा त्याचा दृष्टिकोन कधीच नसतो, तो कायम संघातील प्रत्येकाचा पूर्ण १% निष्ठा व शिस्तीने देण्यावर लक्ष केंद्रित करतो.

- गोष्टींना प्राधान्य कसे द्यावे व त्याबद्दल मार्गदर्शन कसे करावे हे त्याला माहीत असते.

- उद्योजक भविष्यात उद्योगपती बनू शकतो पण उद्योगपती कधीही उद्योजक होऊ शकत नाही कारण उद्योगपती व्यवसाय करण्यासाठी जुनी, परंपरागत कल्पना वापरतात.

- माझ्या मते, प्रत्येक व्यक्तीकडे जन्मतःच उद्योजकीय कौशल्ये असतात. कौटुंबिक संस्कृती, पार्श्वभूमी, कुटुंबाचे उत्पन्न, शैक्षणिक पात्रता, कुटुंबातील सदस्यांची मानसिकता, सुसंगतता इत्यादी गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाच्या असतात.
पण अंततः एक धाडसी निर्णय वरील सर्व गोष्टी बाजूला सारत जीवन बदलू शकतो.

- एक चांगला विचार, उत्तम व्यक्तींचा सहवास, धाडस करण्याची तयारी हीच चांगली उद्योजक बनण्याची गुरुकिल्ली आहे.

योग्य वेळी, योग्य हेतूसाठी, योग्य व्यक्तीबरोबर घेतलेला एक योग्य निर्णय उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व काही बदलू शकतो.


मी व माझे संघ सहकारी अष्टपैलू उद्योजक बनण्याच्या प्रवासावर मार्गस्थ आहोत.

आमच्याकडे येणाऱ्या अशा बर्‍याच होतकरुंना आम्ही उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतो. आमचा अभ्यास, ज्ञान व आलेल्या अनुभवांचा आधार घेऊन त्यांना व्यवसाय करण्याचे विविध मार्ग, मूल्ये, पद्धती शिकवतो व उत्कृष्ट उद्योजक बनण्यासाठी मदत करतो.

जर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने विचार करणारे असाल अथवा तुम्हाला लिखाण तसेच ध्वनीफिती बनवण्याची आवड असेल किंवा विविध उद्योजकीय कल्पनांच्या, सहकाऱ्यांच्या शोधात असाल, तर आमच्याशी संपर्क करु शकता.

त्यासाठी खालील संकेतस्थळांना अवश्य भेट द्या -
👉 टेलिग्राम :

👉 व्हाॅट्सॲप (मराठी समूह) :

😎😎😎



No comments