देणं / (GIVE) !!
देणाऱ्याने देत जावे !!
"आपण समाजाचं देणं लागतो" असं म्हणतात.
माझ्या मते "समाजाचं" ह्याचा अर्थ निसर्ग, आपले पालक, संबंधित-अनोळखी सर्व लोक, स्वतःतील ईश्वराचा अंश, अशा सर्वांचेच...
आपले शरीर हे एक माध्यम आहे जे की नाशिवंत आहे. त्यामुळेच साधू-संताच्या कथा नेहमीच सांगतात की,
गरज असेल त्याला मदत करा, गरज पडलीच तर मदत मागा आणि मनमोकळेपणाने लाभलेल्या जीवनाचा यथेच्च आनंद लुटा.
थोडक्यात, एकमेकां साहाय्य करु, अवघे धरु सुपंथ ।।
कायम देत रहा !!
सुख वाटल्याने वाढते आणि दुःख वाटल्याने कमी होते.
एखादी आनंदाची गोष्ट घडते आणि जेव्हा आपण ती इतरांना सांगतो तेव्हा ते लोकही आपल्या आनंदात सहभाग घेतात आणि दुःखाची गोष्ट असेल तर सांत्वन करतात, आधार देतात.
एखाद्या गरजूला आपण मदत केली आणि तीही निस्वार्थ, तर मनाला खूपच छान वाटते आणि त्या व्यक्तीचा आत्मा आपल्याला जे आशिर्वाद देतो ते म्हणजे बक्षीसंच !!
देणाऱ्याने देत जावे अशी एक म्हण आहे.
ह्या जगात "देणे" ह्यापेक्षा अद्वितीय दुसरी गोष्टंच नाही.
आपली प्रगती ही आपल्या कर्मांवर अवलंबून असते.
भलेही कुणी काही करत नसेल तरीही फक्त चांगल्या कर्मांमुळे, कर्मधर्म संयोगाने त्याकडे अनेकानेक संधी येत राहतात.
निसर्ग आपल्याला कधीच "देत" नसतो, तो आपल्याला "परत देत" असतो.
आपण जे करु त्याची परतफेड होत असते. त्यामुळेच स्वार्थात परमार्थ शोधावा असे मी म्हणेन.
मनाला छान वाटते ह्या स्वार्थापोटी का होईना पण मदत करावी.
खरे तर काही अपेक्षा ठेवून जर एखादी गोष्ट आपण केली तर ती काही अंशीच आपल्यापर्यंत पोहोचते परंतु विनाअपेक्षा एखादी गोष्ट आपण करतो तेव्हा आपल्याला १००% हून अधिक मिळते.
कारण, अपेक्षा न ठेवता केल्याने आपल्या मनात त्याबद्दलचे कुठलेच विचार राहत नाहीत. त्यामुळे आपण त्यात अडकून पडत नाही, नवीन विचारांना भरपूर जागा मिळते, मन विविध कृती करते आणि कायमच प्रसन्न राहिल्याने नवनवीन परिणाम दिसू लागतात.
'देणे' हा देवाला हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे की उत्तम काम करण्याचा माझा भाव आहे आणि मला अजून अधिक प्रमाणात तो वाढवायचा आहे.
आपण 'किती देतो' ह्यापेक्षा 'देतो आहोत' हे जास्त महत्वाचे आहे.
देणं म्हणजे - आधार, मदत, दान, विश्वास असे....
जर तुम्ही "देणं" हे तत्त्व पाळत असाल तर उत्तमच पण नसाल तर एक प्रयत्न नक्की करुन पाहा, तुमचा तुम्हालाच आल्हाददायक अनुभव येईल.
एका पुस्तकाचा सारांश माझ्या वाचण्यात आला होता, त्यात खूपच सुंदर पद्धतीने "देणं" म्हणजे काय ह्याचे वर्णन केले आहे.
हे पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे, तेथे जाऊन तुम्ही ते विकत घेऊ शकता 👇
फावल्या वेळात पुस्तके वाचावीत, ज्यामुळे विचारांची प्रगल्भता वाढते.
खास करुन वाचकांसाठी हे उत्तम पुस्तक आहे.
💫💫💫💫💫💫
"देणं" ह्या तत्त्वानुसार आमचा समूह अनेक मोफत सेवा पुरवतो ज्यापैकी एक म्हणजे एकत्र येऊन पुस्तक वाचणे जे दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल.
तुम्ही ह्याचा अनुभव नक्की घेऊन बघा.
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुमचे नाव ह्या मोफत सेवेसाठी नोंदवू शकता 👇
💫💫💫💫💫💫
तसेच आम्ही सर्व आमच्या परेने काही ना काही मदत/सहकार्य/दानधर्म करत असतो.
"उडान" ही अशीच एक संस्था आहे जी "Type 1 diabetic" मुला/मुलींकरता विनाशुल्क सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी व उत्तम जीवनाच्या जडणघडणीसाठी कार्य करते.
तुम्ही सुद्धा तुमच्या ईच्छेनुसार त्या मुलांचे सुदृढ जीवन घडवण्यात हातभार लावू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर भेट द्या 👇
🙏🙏
भेटूयात पुढच्या ब्लॉग मधे...👋👋
धन्यवाद...😃
2 comments
खूप सुंदर लेख, वाचतानाच देण्याची अनुभुती येते.
Nice
Post a Comment