लोक वाचत का नाहीत ? / Why don't people read ?
लोक वाचत का नाहीत?
आवड आणि गरज ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत.
डॉक्टर सांगतात की, "उत्तम आरोग्यासाठी फास्ट फूड कमी खा, सकस अन्नाचा आहार ठेवा."
फास्ट फूड जिभेला चांगले वाटते परंतु शारीरिक स्वास्थ्यासाठी हानिकारक असते.
फास्ट फूड ही आवडती गोष्ट पण ती गरजेची नाही आणि जे गरजेचे आहे ते खाल्ले जात नाही त्यामुळे आजार बळावतात. त्याप्रमाणेच समृद्ध जीवन जगण्यासाठी काही गरजेच्या गोष्टींची आवश्यकता असते.
"वाचन" हे ह्याच गोष्टींमधे मोडते.
जाणकार मंडळी कायम असेच सांगतात की लिखित स्वरुपात जे उपलब्ध असते त्यावर जास्तीत जास्त काम करा, त्याचा लाभ घ्या.
कारण वाचनाने ज्ञान, शब्दसंचय, सुसंवाद तसेच उत्पादनक्षमता वाढते.
मराठीत एक म्हण आहे - "वाचाल तर वाचाल."
आज आपण जगात आत्मविश्वासाने वावरतो ते बालपणापासून वाचत आलो म्हणूनच.
शाळेत असताना आपल्याला शिकवले जाते :
"Read Recall Reproduce" - वाचा, आठवा, लिहा
ह्या शिकवणीमुळे आपण अभ्यास करत, परीक्षा उत्तीर्ण होत स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो.
वक्तृत्व आणि लिखाण ह्या दोनही गोष्टी वाचनानेच सुधारतात.
वाचन हे जीवन जगण्याची खरी दिशा दाखवते.
सध्या बाजारात अनेक प्रकारचे स्रोत उपलब्ध आहेत.
परंतु त्यांचा भडिमार इतका प्रचंड प्रमाणात झालाय की ते सर्व झेपण्यापलिकडे जाते.
त्याबरोबरच कंटाळा, आळस, "हे वाचून मला काय फायदा होणार आहे" हा गैरसमज, तर कधी "मला हे माहीत आहे, त्याची काही गरज नाही" किंवा माझ्याकडे वेळ नाही अशा चुकीच्या वृत्तींमुळे वाचन टाळले जाते.
काही सामाजिक संपर्क माध्यमे (जसे व्हाॅट्सॲप, फेसबूक वगैरे) यांवर शेकडोंनी संदेश येत असतात. त्यातील अनेक निरुपयोगी असतात, परंतु न वाचता पुढे सरकवण्याच्या नादात उपयुक्त गोष्टीही सुटत जातात आणि हातून चांगली संधीही सुटून जाते.
मी अनेकांना म्हणताना ऐकतो की, "मला वाचायची ईच्छा आहे पण काही स्रोत नाही, तर काय करणार !"
अशा लोकांसाठी मला उत्तम म्हण आठवते - "काखेत कळसा आणि गावाला वळसा !!"
जो तुमच्यासोबत २४ तास, ७ ही दिवस आणि १२ ही महिने उपलब्ध असतो (फोन), किमान त्याचा जरी योग्य वापर केलात तरी अनेक मार्ग सापडतील आणि जे हवंय ते मिळायला जास्त वाट पाहावी लागणार नाही.
त्यासाठी वेळ मात्र काढवा लागेल.
म्हणूनच माझे वैयक्तिक ठाम मत आहे की ज्ञान ग्रहण करण्यासाठी मिळेल तिथून वाचन करावे.
कोणतीही व्यक्ती फक्त जन्माला आली आहे म्हणून जगत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ध्येय असते.
परंतु, बर्याचदा ते साध्य करण्यासाठी मार्ग सापडत नाही.
पण जर वाचनाची ताकद सोबत असेल तर चमत्कार सुद्धा घडतात.
कधी आणि केव्हा, कोणत्या वाचनातून एखादी सूचक गोष्ट आपल्या मनाला भिडेल सांगता येत नाही.
प्रत्येक यशोगाथा ह्याचे उत्तम उदाहरण आहे.
जर तुम्हालाही तुमची यशोगाथा अव्वल दर्जाची हवी असेल तर आत्ताच सुरुवात करा. करमणूक म्हणून का होईना पण वाचनाची हळू हळू सवय लागेल आणि नंतर एक उत्कृष्ट वाचक, लेखक, मार्गदर्शक म्हणूनही प्रसिद्धी होईल.
मी लिखाण करु शकतो कारण मला वाचन आवडत नसतानाही ती गरज मी ओळखली म्हणून...
आमचा समूह याच बाबीवर विश्वास ठेवतो म्हणून आम्ही सर्व आमची सोबत होणारी प्रगती अनुभवू शकतो.
आम्ही आमच्या अधिकृत संकेतस्थळावर अनेक जबरदस्त सेवा पुरवतो.
👍 त्यापैकीच एक म्हणजे "बूक रिडींग क्लब" .
याठिकाणी आम्ही सर्व जण एकत्र येऊन जी प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित असतील व त्यांचा उपयोग होईल अशी पुस्तके वाचतो.
पहिला अर्धा तास वाचन आणि त्यानंतर अर्धा तास जे शिकलो त्यावर चर्चा.
प्रत्येक व्यक्तीची समज वेगळी असते. एकत्र येऊन वाचण्याचा आणि चर्चा करण्याचा फायदा हा की, सुटलेल्या किंवा लक्षात न राहिलेल्या गोष्टी पुन्हा आठवतात, त्यावर विचार विनिमय होतो आणि त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होते.
खालील लिंक वर आमच्याशी जोडले जाऊन तुम्हीही ह्या सेवेचा नक्कीच लाभ घेऊ शकता.
अवश्य भेट द्या -
👉 Book reading club :
👉 व्हाॅट्सॲप :
👉 टेलिग्राम :
धन्यवाद...🙏
-------------------------------------------------------------- X -----------------------------------------------------------
Why don't people read...?
Desire and need are two different things.
The doctor says, "Eat less fast food, and maintain a healthy diet for better health."
Fast food tastes good but is bad for physical health.
Fast food is the most favorite thing but it is not necessary and What is needed is not eaten which makes diseases stronger. Similarly, living a prosperous life requires certain necessities.
"Reading" falls into these things.
The wise people always say to make the most of what is available in written form, take advantage of it.
Because reading increases knowledge, vocabulary, communication, and productivity.
There is a proverb in Marathi which states that "You will be saved if you read."
Today we live in the world confidently because we have been reading since childhood.
We are taught while in school :
"Read Recall Reproduce" - Learn, Remember, Write
Due to this lesson, we can grow and stand tall by studying and passing exams.
Both communication and writing are improved only by reading.
Reading shows the true direction of living.
Currently, there are many types of sources available in the market.
But their bombardment is so overwhelming that it goes beyond leaping.
Besides, reading is avoided due to boredom, laziness, misunderstanding of "what will I benefit from reading this", and sometimes "I know this, there is no need for it" or I don't have time.
Some social media platforms (such as WhatsApp, Facebook, etc.) receive hundreds of messages. Many of them are useless, but in the rush to move on without reading, useful things are missed and good opportunities are also missed.
I hear many people say, "I want to read but I don't have any sources, so what to do!"
I remember a great saying for such people which means, walking around even though the thing is nearby.
One thing which is available with you 24 hours, 7 days, 12 months (phone), at least if it is used for the right purpose, there will be found many solutions and you will not have to wait long to get what you want.
However, time will have to be taken for that.
That is why I personally strongly believe that one should read from wherever one can get knowledge.
No person lives just because he is born. Everyone has some goal in life.
But, often there is no way to achieve it.
But if the power of reading is with you, then miracles can also happen.
Nobody knows when and how a suggestive will strike your mind while reading something.
Every success story is a good example of this.
If you too want your success story to be top-notch, start now. At least as a pastime, reading will gradually become a habit and later you will become famous as an excellent reader, writer, and guide.
I can write because I recognized the need even though I didn't like reading...
Our group believes in the same thought, so we all can experience our progress together.
We provide many amazing services on our official website.
👍 One of them is the "Book Reading Club."
Here we all come together and read books that are relevant and useful in real life.
The first half an hour of reading is followed by half an hour of discussion on the learnings.
Each person's understanding is different. The advantage of reading and discussing together is that missed points are recalled, and ideas are exchanged which helps to enhance the love of reading.
You can surely benefit from this service by connecting with us at the link below.
Must visit -
👉 Book reading club :
👉 Telegram :
Thank you...😇
3 comments
Books are indeed a great source of knowledge and inspiration. Amazing blog Mak!
Great writing 👏🏻 it reminds me of a saying that books are our best friends 📚
It's true, Books are our friends,
Amazing blog.
Post a Comment