Updates

नशीब की कर्म / LUCK or KARMA ??

 



नशीब की कर्म ??

मी तबला शिकण्यास १५ वर्षांपूर्वी सुरुवात केली होती.
तेव्हा तिथे एक मुलगा तबला शिकायला यायचा...
त्याची गोष्ट अशी की, तो फिरत फिरत सहज तिकडे आला होता, सहज म्हणून त्याची सरांशी भेट झाली. काही न शिकता उपजत त्याला तबल्याचं थोडं ज्ञान होतं.. ते पाहून सरांनी त्याला शिकण्याचा सल्ला दिला आणि त्याच्या पालकांनी लगोलग त्याला अकादमी लावून दिली.
प्रशिक्षण सुरु झाल्यापासूनच तो खूप हुशार होता. आमची प्रगती जवळपास सारखीच पण त्याच्यात काहीतरी खास होतं.
मी अकादमीत येण्याच्या चार महिन्यांनंतर तो तिथे यायला लागला होता आणि पुढे तीनच महिन्यात त्याला सरांनी परीक्षेला बसवलं (जिथे इतरांना सहा महिने ते एक वर्ष लागतं).
परीक्षा झाली आणि निकाल लागला.. १०० पैकी मला मिळाले ९६ आणि त्याला ९८ गुण.
अशा सर्वच गोष्टींमुळे आमची खूप छान मैत्री झाली होती.

पुढे काही दिवस मी बाहेरगावी गेलो होतो. परत आल्यानंतर पुन्हा अकादमीत येणं सुरु केलं.
आल्यानंतर मला समजलं की तो अकादमीत येत नाहीये.
जवळ जवळ दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ तो आलाच नाही म्हणून मी त्याला खास फोन करुन भेटायला बोलावलं.
आमची भेट झाली तेव्हा,
मी: काय रे, तू क्लासला येत का नाहीस.....?
तो: अरे मला खूप बोअर होतं !!
मी: काय बोलतोयस..!! इतका छान तबला वाजवतोस, शिकवलं की पटकन लक्षात येतं तुझ्या... २-३ प्रॅक्टीस मधे काहीही प्रेझेंट करु शकतोस.
इतकं छान असूनही का नाही येत...?
तो: आधी शाळा, क्लास करायचे, नंतर तिकडे यायचं.
आठवड्याला चार दिवस रियाजही करायचा.. बाकी कुठे जाता येत नाही.. बोटं दुखतात, कायम नखं काढावी लागतात.. कंटाळा येतो..
आणि तुझ्यासारखं वाजवता येत नाही रे...मजा येत नाही !!

हे ऐकून मला आश्चर्यच वाटलं !!
कारण तो तांत्रिक दृष्ट्या माझ्यापेक्षा खूपच परिपूर्ण होता.

त्याच्या मागे इतर सर्व बोलायचे की, "तुम्ही दोघं लकी आहात. तुम्हाला पटकन जमतं सगळं. पण तो शिकायला येत नाही!
हे असं आहे, बघ... ज्यांना नशीबाने मिळालं आहे त्यांना त्याची किंमत नाही आणि आम्ही चार-पाच वर्षांपासून कष्टं घेतोय, तेव्हा कुठे आता थोडं जमायला सुरुवात झालीये."
त्यांचं हे बोलण मला पटलं कारण ते सत्य होतं.

मी त्याला बोललो की, "काही पण बोलू नकोस आणि असंच केलंस तर पुढे पस्तावशील तू, लिहून घे."

शालेय परीक्षा, शिकवणी आणि बाकी गोष्टी, ह्या कशामुळेही मी अकादमीत जाणं थांबवलं नाही.
सराव थोडा-फार कमी व्हायचा पण तो करणं सोडलं नाही.
शिकवलेलं मला पटकन कळायचं, ह्याचा अर्थ असा नाही की मी थेट तबला पंडित असल्यासारखा तबला वाजवायला हवा, परंतु त्यासाठी मी आजही प्रयत्नशील आहे.

सांगण्याचा मुद्दा हा की,
लोक म्हणतात, नशीब आहे.
काही म्हणतात नशीब वगैरे असं काही नसतं.

माझ्यामते, जीवनात
९९% हे नशीब असतं आणि १% कर्म.
म्हणजे काय तर, माझं तबला वादनाच्या बाबतीत
९९% नशीब होतंच पण जो शिल्लक १% आहे तो खूपच महत्त्वाचा होता आणि आहे.
कारण मी संयम आणि चिकाटी ठेवली म्हणून इतका विश्वासार्ह तबला वाजवू शकतो. अगदी डोळ्यावर पट्टी बांधून, तबल्याकडे न बघता दोन-तीन तासाच्या मैफिलीत सुद्धा !!

प्रत्येक व्यक्ती सारखी नाही.
त्यांचे हे %चे प्रमाण कधी ०.९, ०.४ तर कधी ०.००१ असते.

स्वतःच कौतुक करण्याचा माझा हेतू नाही पण
तबल्याच्या बाबतीत मी त्या १% ला १००% न्याय देत आलो म्हणून ते जमलं.

आज तो मित्र माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजर असतो, माझ्या कलेला, सादरीकरणाला छान दाद देतो.
तो नेहमी म्हणतो की, "मला तुझं वाक्य आठवतं.. तू पुढे पस्तावशील! अगदी खरंय ते. जर मी तुझ्यासारखाच टिकून राहिलो असतो तर..!!"

थोडक्यात,
८४ लक्ष योनी फिरुन मनुष्य जन्म मिळतो असं म्हणतात.
लाखो शुक्राणू एक बीजावर आक्रमण करतात पण त्यातून केवळ एकच शुक्राणू आत जाऊन त्यापासून गर्भ तयार होतो.
म्हणजे पृथ्वीतलावर जो मनुष्य जीवंत आहे तो प्रत्येक जण नशीबवानच म्हणावा लागेल, यात तिळमात्रही शंका नाही.

तर,
व्याख्या माझ्यामते अशी करता येईल,
९९% नशीब + १% कर्म = १००% भाग्य/दैव.😇



LUCK or KARMA ??

I started learning Tabla 15 years ago.
A boy used to come over there to learn Tabla ...
The incident that happened was, he came there very casually while wandering around, he had an easy meet with Sir. Without learning anything he had good knowledge of Tabla. Seeing that, Sir advised him to have the training and his parents immediately set up an academy for him at Sir's place.
He was very smart right from the start of his training. Our progress was almost the same but there was something special about him.
He started coming there four months after I joined the academy and within three months Sir made him sit for the exam (where others take six months to a year).
The exam is done and the result came out. Out of 100, I got 96 and he got 98 marks.
All these things made us very good friends.

A few days later I went out of the city. After returning I started coming to the academy again.
After resuming the academy, I got to know that he is not coming to the academy.
Since he didn't come for more than two months, I called him specially to meet.
When we met,
Me: Hey, why are you not coming to class.....?
Him: Umm, I feel very boring !!
Me: What are you talking about..!! You play the tabla so well, you learn it quickly. You can present anything in 2-3 practices.
Even though it's so nice, why don't you come...?
Him: Firstly, attend school, tuition, then come to the academy...
Do Riyaz four days a week. I can't go anywhere else.. fingers get hurt, and my nails have to remove all the time. I get bored.
And I can't play like you. It's not joyful..!!

I was surprised to hear this !!
Because he was technically more perfect than me.

Behind him, everyone else used to say, "You two are lucky. You understand everything quickly, but he doesn't come to the academy.
It's like this, see. Those who get things by luck don't know how to value it and we have been working hard for four to five years, but now we have started to collect a little."

I understood what they said because it was true.

I said to him, "Don't say anything and if you do, you will repent later, mark my words."

School exams, classes, and other things, nothing stopped me from going to the academy.
The practice used to be a little less but I didn't stop doing it. I was taught to know quickly, that doesn't mean playing the tabla like a tabla master straight away but I am still trying for that.

The point is,
People say, there is luck.
Some say, there is no such thing as luck.

In my opinion, in life
99% is luck and 1% is karma.
In case of my tabla playing
99% is Luck but the remaining 1% was and is very important.
I can play Tabla with such confidence because I had patience and perseverance. Even in a two-three hour concert blindfolded, without looking at the tabla !!

Not every person is the same.
Their % is sometimes 0.9, 0.4 and sometimes 0.001.

I don't mean to praise myself though but in the case of Tabla, I have been giving 100% justice to that 1% so it worked out.

Today, that same friend attends every program of mine and appreciates my art and presentation.
He always says, "I remember your saying, you will repent...it's so true. If only I could stay firm like you..!!"

In short,
It is said that a human being is born after 84 lakhs yoni cycles.
Millions of sperm invade an ovum but only one sperm enters it to form an embryo.
That means every person who is alive on the earth must be said to be lucky, and there is no doubt about it. 

So,
By definition, it can be,
99% Luck + 1% Karma = 100% Fortune.😇


🌸💫💫🌸💫💫🌸

👉 We share our thoughts on various topics and experiences that we learn on our official community website.
👉 You can stay connected with us by clicking on the following link.
Thank you...😁

7 comments

Chinmay said...

Amazing! This is very true. I also find myself not giving my 100% to that 1% of hard work.I will definitely do it henceforth. Thanks for sharing this Mak!

Shubhangi Kulkarni said...

Very True,खूप सुंदर लिहिलस.

Aishwarya said...

Excellent.. I totally agree with you..

Swarali J said...

Mast lihilay,
Especially the conclusion line...👌

Adwait said...

शब्दसंग्रह आणि कल्पनाशक्ती दोन्हीही उत्तम आहेत तुझे.
Keep it up.

Pravin Dinkar Kulkarni said...

मकरंद, जसं तू तुझ्या ब्लाॅग मध्ये म्हणालास अगदी तसंच तुझी पोस्ट वाचणं हे माझ्या नशिबात होतंच, सदर पोस्ट वाचण्यासाठी मी फक्त एक टक्का कर्म केलं....

Vinay Panchakshari said...

सुंदर लिखाण केलयंस 🤝👍