उलट्या नामे तरला वाल्या / Blessed by contrary chanting !!
उलट्या नामे तरला वाल्या !!
"दोन्ही बाजूंनी विचार करुन निर्णय घ्यावा" हा सल्ला अनुभवी, मोठे लोक नेहमीच देतात. त्यांचा भर ह्या बाबीवर असतो की, प्रत्येक गोष्टीत बरोबर - चूक किंवा चांगली - वाईट बाजू असते, त्यामुळे सारासार विचार करुन वागले पाहिजे.
माझ्या मते, कुठलीही गोष्ट ही योग्य किंवा अयोग्य नसते.
व्यक्तीचे त्याबद्दलचे विचार, मत किंवा त्यासोबत केलेली कृती ही त्या गोष्टीला योग्य किंवा अयोग्य ठरवते.
अर्थात, त्या व्यक्तीचा हेतू/उद्देश …!
उदाहरण द्यायचे झाल्यास,
- एक व्यक्ती सरळ मार्गाने वाहन चालवत आहे आणि दुसरी व्यक्ती विचित्र पद्धतीने…
काही वेळानंतर बघितल्यास दुसर्या व्यक्तीचा अपघात झालेला असण्याची शक्यता जवळ जवळ निश्चित असते.
ह्यात त्या रस्त्याचा किंवा वाहनाचा काहीच दोष नाही कारण पहिली व्यक्ती अतिशय सुखरुप पणे अंतर पार करुन जाते.
एक सुंदर अशी बोधकथा आठवते :
भैरवी रागातील एक उत्तम गीतरचना आहे -
उलट्या नामे तरला वाल्या, धन्य प्रभूचे नाम ।
श्री राम श्री राम जय जय राम ॥
कथासार असे की,
कुटुंबाचे पालन करण्यासाठी वाल्या नावाचा एक मनुष्य आपल्या वडीलांसोबत शिकार करण्यास जात असे. जी शिकार होईल त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चाले. कालांतराने, आई-वडील थकले, परिवारातील सदस्यांची संख्या वाढली, अन्नधान्य कमी पडू लागले. त्यामुळे तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धमकावून, मारण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून धन, धान्य लुटायला लागला. त्यांनी विरोध केला तर त्यांना ठार मारायला लागला. असे करता करता सात रांजणे भरतील इतके पाप त्याच्याकडून घडले.
त्याच मार्गावर अचानक एकदा नारद मुनी अवतरले.
त्यांना पाहून नेहमीप्रमाणे त्याने ठार मारण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू देण्यास सांगितले.
तेव्हा नारदांनी त्यास प्रश्न केला,
नारद : तू हे कशासाठी करतोयस ?
वाल्या : मी हे माझ्या कुटुंबासाठी करतो.
नारद : पण हे पापकृत्य आहे. तुझ्या कुटुंबातील लोक ह्या पापात तुझे साथीदार होतील ह्याची तुला खात्री आहे का …?
वाल्या : का नाही !! त्यांच्यासाठीच तर हे सर्व करतोय, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी म्हणून…
नारद : मग घरी जाऊन एकदा त्यांना विचार आणि काय म्हणतात मला सांग.
वाल्या लगेच घरी जाऊन प्रत्येकाला विचारतो पण त्याची साथ देण्यास कुणीच तयार होत नाहीत.
तेव्हा त्याला त्याची चूक लक्षात येते.
परंतु, पाप इतके झालेले असते की त्याचे क्षालन कसे होणार ह्याच विवंचनेत तो नारदांकडे येतो आणि त्यांना उपाय विचारतो.
तेव्हा नारदमुनी त्यास "राम" नामाचा जप कर असा उपदेश करतात आणि निघून जातात.
पाप प्रचंड वाढलेले असल्याने राम हे शब्द सुद्धा नीट उच्चारता येत नव्हते.
"मरा मरा मरा" असे उच्चार तोंडून निघे.
परंतु, मनातील निर्मळ भाव आणि चांगला हेतू यामुळे कालांतराने
"मरा मरा मरा मरा मरा"
ह्याचे उच्चारण
"म राम राम राम राम राम रा"
ह्यामधे झाले आणि सर्व पापे नाहीशी होऊन वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले ज्यांनी महान रामायण रचले.
"मरा" हा वाईट शब्द आहे आणि त्याउलट "राम" म्हणजे परमोच्च, आनंद, पुण्य, मोक्ष …!!
ह्याप्रमाणेच काही शब्द असे आहेत की ज्यांचा उलट उच्चार सुद्धा चांगलाच निघतो.
जसे -
विद्या ह्या शब्दाचा उलट उच्चार केल्यास द्यावी असा होतो.
- विद्या दिल्याने वाढते.
भला - लाभ
- कुणाच्या भल्याचा विचार केल्यास आपल्यालाही लाभ होतो.
सखा - खास
- काही मित्र असे असतात की जे जीव की प्राण असतात अर्थातच खास.
अगदी ह्याप्रमाणेच जर प्रत्येक गोष्टीचा, परिस्थितीचा, व्यक्तीचा चांगल्याच हेतूने, दृष्टिने विचार केला तर दोन्ही बाजूंनी चांगलाच प्रत्यय येईल, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील किंवा प्रश्नंच उद्भवणार नाहीत.
माझं असं प्रामाणिक मत आहे की, प्रत्येक गोष्ट ही उत्तमच वाटेल
फक्त आपल्या मनातील भाव हा कायम पवित्र किंवा निर्मळ असायला हवा.
ह्यावर तुमचे मत काय …?
कुठलीही गोष्ट करताना, कुणाशीही बोलताना, वागताना तुमचा भाव, हेतू, उद्देश कसा असावा…?
ह्याचा नक्की विचार करा आणि मला तुमचे मत अवश्य कळवा.
💫💫💫💫💫💫💫
👉 ब्लॉगिंग/लेखन, वाचन, प्रशिक्षण अशा अनेक गोष्टींसाठी आमचा व्हाॅट्सॲपवर गृप आहे.
👉 तसेच, आमच्या वैयक्तिक संकेतस्थळावर आम्ही बर्याचशा सेवा पुरवतो त्यापैकी एक म्हणजे स्वतःचे ब्लॉगिंग पेज बनवणे, ब्लॉग लिहीणे आणि त्यासंबंधित सर्व बाबींचे आम्ही मार्गदर्शनही करतो.
खालील लिंकवर क्लिक करुन तुम्हीही ह्या सगळ्याचा भाग होऊ शकता आणि उपभोग घेऊ शकता 👇
धन्यवाद … 😁
----------------------------------------------------- X ------------------------------------------------------
Blessed by contrary chanting !!
"A decision should be made after considering both sides" is always the advice given by experienced, senior people. Their emphasis is on the fact that in everything there is a right-wrong or good-bad side, so one should act prudentially.
In my opinion, nothing is right or wrong.
It is the person's thoughts, opinions, or actions towards it that make it right or wrong.
i.e. that person's intention/purpose …!
For example,
One person is driving a vehicle in a straight, proper way and another person is driving in a strange, abnormal way...
If looked back after some time, almost certainly the second person will be involved in an accident.
There is no fault of the road or the vehicle as the first person covers the distance very comfortably.
I remember a beautiful parable here :
One of the great lyric compositions in Marathi in Bhairavi raga states that –
Valya was blessed even by chanting the reverse name of Lord Shri "Rama".
As the story narrates,
A man named Valya used to go hunting with his father for nurturing the family. Their sustenance was dependent on the prey. Over time, his parents got tired, the number of family members increased, and the daily meals became scarce. So he started threatening the pedestrians and robbing them for money and food by showing fear of killing them. If they resisted, they were killed. By doing so he committed a sin worth seven earthen pots.
Once Narada Muni suddenly descended on the same path.
Seeing him, as usual, he threatened to kill him and asked him to hand over his valuables.
Then Narada questioned him,
Narada: What are you doing this for?
Walya: I do this for my family.
Narada: But this is sinful. Are you sure that your family members will be your accomplices in this sin...?
Valya: Why not !! I am doing all this for them, as a responsibility of their upbringing...
Narada: Then go home and ask them once and tell me what they say.
Valya immediately goes home and asks everyone but no one is willing to support him.
Then he realizes his mistake.
But, due to the burden of sin, in a dilemma
Valya comes to Narada and asks him for a solution for how to wash it off.
Then Narada muni exhorts him to chant the name "Rama" and leaves.
Even the word Rama could not be pronounced properly by Valya as the sin had increased so much.
"Mara, Mara, Mara" came out of his mouth.
But, with time due to pure feelings and good intentions
"Mara Mara Mara Mara"
got pronounced as
"Ma Rama Rama Rama Rama Rama Ra"
Eventually, all sins disappeared and Valya became the sage Valmiki aka Valmiki rishi who composed the great Ramayana.
Mara means to die in Marathi and on the contrary Rama means supreme, bliss, virtue, salvation...!!
Similarly, there are some words in Marathi whose reverse pronunciation also works well.
like -
Vidya means knowledge - the contrary is Dyavi means to give
- Knowledge increases by sharing
Bhala means well-being - Labh means benefit
- Thinking about someone's well-being also benefits us.
Sakha means friend - Khas means very special
- There are some real friends who are the most beloved, dearest ones, like very special
Just like this, if every thing, situation, or person is considered with good intention and vision, then there will be a good conclusion from all sides, many questions will be answered or no questions will arise at all.
My honest opinion is that everything will be fine only the emotion in our mind should always be pure or sacred.
What is your opinion on this...?
What should be your attitude, intention, and purpose while doing anything, talking to anyone, or behaving...?
Be sure to give it a thought and let me know what you think.
💫💫💫💫💫💫💫
👉 We have a WhatsApp group for blogging/writing, reading, training, etc.
👉 Also, one of the many services we provide on our community website is creating your own blogging page, and writing a blog and we also guide you in all the related matters.
You can also be a part of and enjoy all this by clicking on the link below 👇
Thank you …😁
8 comments
मनातील भाव नितळ असल्यास शब्दाच्या उलट उच्चाराचाही सुंदर अर्थ निघतो ~ सुंदर संकल्पना, सुंदर कल्पनाशक्ती ������
With prayer, we shall keep our heart pure.
Nice blog, the message too...👍🏻
Khup sunder Vichar ahe
Khup chhan....
मला ब्लोगचं नावच फार आवडलं "उलट्या नामे तरला वाल्या."
मस्त लिहिला आहे मकरंद.
ह्या सगळ्या ब्लोग्स च तू लौकरच एक पुस्तक बनवशील अशी खात्री आहे मला.
खूप खूप शुभेच्छा. 😊😊😊
Nice blog with Nice explanation 👍 Keep up the good work! MPTY 😊
Nice blog
मस्त आहे.
Post a Comment