प्रवास, अध्यात्म आणि श्रीमंती / Travel, Spirituality and Richness !!
प्रवास, अध्यात्म आणि श्रीमंती !!
"प्रवास माणसाला श्रीमंत बनवतो" असं म्हणतात.
परंतु माझ्या मते, ह्या वाक्यापुढे कंसात आणखी एक वाक्य आहे ज्याकडे बहुतेक जणांचे लक्ष जात नाही.
ते असे की,
"प्रवास माणसाला श्रीमंत बनवतो (जेव्हा तो प्रवास करत असताना लोकांशी संवाद साधतो)."
माझ्या अनुभवानुसार,
जगात सर्वात जास्त विकली जाणारी गोष्ट म्हणजे "विचार".
आणि जर आपण विचारविनिमय केलाच नाही तर श्रीमंत कसे होणार ??
शक्यतो, प्रवास करताना किमान एका तरी धार्मिक स्थळाचा समावेश आपल्या सहलीत असावा, असे माझे ठाम मत आहे.
देवावर श्रद्धा असण्याचे संस्कार पुरातन काळापासून आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीवर झालेले आहेत.
निसर्ग, ब्रम्हांड ही देवतत्त्वे आहेतच परंतु, ज्याप्रमाणे जन्म देणारी ही एकच आई असते त्याप्रमाणेच देवतत्त्वाचे एक मूर्त रुप असणे अत्यंत आवश्यक असते.
भारत ही देवभूमी किंवा भक्कम आध्यात्मिक पाठबळ असलेली भूमी म्हणतात, कारण मूर्त रुपे असलेली अनेक धार्मिक स्थळे भारतात अस्तित्वात आहेत.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने कर्नाटक राज्यातील बेंगालुरु (बँगलोर) शहराजवळील एका गावात असलेल्या महादेव(शंकरा)च्या मंदिरामधे दर्शनाचा योग आला. त्याठिकाणी, महादेवाची ११२ फूट उंच मूर्ती होती, वर टाकलेला फोटो हा त्याच मूर्तीचा आहे.
लांबून पाहतानाच मन थक्क झाले होते आणि जेव्हा जवळ जाऊन उभा राहिलो तेव्हा भलेमोठे पटांगण, उपस्थित असलेल्या लोकांकडून केला जाणारा नामाचा जयघोष, तिथली ऊर्जा आणि उत्साही वातावरण ह्यागोष्टींमुळे अगदी भारावून गेलो होतो.
थोडा वेळ तिथे थांबल्यावर मनात एक विचार आला की इतकी मोठी मूर्ती बांधण्याचे कारण काय असेल ??
आणि काही क्षण विचार केल्यानंतर माझे मलाच उत्तर सापडले.
जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट दिसत नाही तोपर्यंत आपण त्यागोष्टीकडे आकर्षित होत नाही किंवा एखादी गोष्ट दिसते आहे तोपर्यंतच आपण तिच्याकडे लक्ष देतो.
ही मूर्ती उंच असल्याने दूरवरुन सुद्धा सहज दिसते, त्यामुळे कुणीही लगेच आकर्षित होऊ शकते.
तसेच, कितीही गर्दी असली तरीही सहज दिसणारी ती मूर्ती आणि तेथील वातावरण यांमुळे आपण मनाने आणि शरीराने पूर्णतः तिथेच उपस्थित राहतो.
"धार्मिक स्थळांचा समावेश असावा" हे म्हणण्याचे कारण असे की, सर्वात जास्त वर्दळ असलेली ठिकाणे तीच असतात. तेथे लोकांचा सर्वात जास्त वावर असतो, त्यामुळे आपला अनेकांबरोबर संपर्क होतो, वाढतो आणि विचारविनिमय, संभाषण होऊन माहिती मिळते, विचारांमधे, ज्ञानामधे भर पडते.
नामोच्चार, नामस्मरण, मंत्रोच्चारण आणि मंत्रघोष यांमुळे वातावरणात ध्वनी लहरी, कंपने निर्माण होतात आणि ती थेट आपले हृदय व मेंदूला जाऊन भिडतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळित, गतिमान होतो आणि विचारशक्तीमधे प्रगल्भता येतो.
तसेच, तेथील वातावरणामुळे शरीरात संचारणारी ऊर्जा मनातील सर्व नकारात्मक विचार, ताणतणाव, चिंता अशा सर्व हानिकारक गोष्टी नाहीशा करते.
त्यामुळे आपसूकच मन स्वच्छ होऊन ताजेपणा, उत्साह आणि काम करण्यासाठी गरजेची असणारी आक्रमकता वाढते.
आपोआपच सर्व गोष्टी सुधारतात, सुकर होतात आणि यश वृद्धिंगत होते.
मला ह्याच गोष्टींमुळे नवनवीन ठिकाणे फिरणे, विविध लोकांना भेटणे आवडते.
म्हणायला गेल्यास ते रक्तातच आहे, त्याशिवाय जगणे कठीणंच !
त्यामुळेच हा माझा ठाम विश्वास आहे आणि मी नेहमी हेच म्हणतो की,
प्रत्येकाने भरपूर प्रवास करावा,
त्यात किमान एका धार्मिक स्थळाला भेट द्यावी
आणि
विचारांनी श्रीमंत होऊन सामाजिक, मानसिक व आर्थिक प्रगतीचा मार्ग गाठावा ...!!
💫💫💫💫💫💫💫
👉 आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो तेव्हा समविचारी लोक आपल्याला भेटत जातात आणि एका नवीन आणि सुंदर अशा प्रवासाला सुरुवात होते.
मी आणि माझे सर्व सहकारी ह्याच कारणास्तव सोबत आहोत आणि नवनवीन गोष्टी शिकून स्वतःचा विकास साधत आहोत.
👉 तुम्हीही अशा अनेक गोष्टी ज्यांमुळे आम्हाला दैनंदिन जीवनात तसेच व्यवसाय वाढीकरता फायदा होतो त्या आमच्याकडून शिकून घेऊ शकता.
त्यासाठी खाली दिलेल्या गृपच्या लिंकवर जाऊन स्वतःची नोंद करा आणि नवनवीन गोष्टी शिकून घ्या 👇
धन्यवाद ... ✌😇
--------------------------------- X -------------------------------
Travel, Spirituality and Richness !!
It is said that "traveling makes a person rich".
But in my opinion, there is another sentence written ahead of this sentence which most people don't notice.
That is,
"Traveling makes a person rich (provided, he interacts with people while traveling)."
In my experience,
The most sold thing in the world is "thoughts".
And if we don't exchange the thoughts, how can we get rich ??
I strongly believe that at least one religious place should be included in every trip.
The rites of having faith in God have been implanted in every person since ancient times till today.
Nature, the Universe are some idol of Deities, but just as there is only one mother who gives birth, it is essential to have an embodiment of the deity.
India is called Devabhumi or the land of strong spiritual background and presence because many religious places with embodiment, tangible forms exist in India.
On the occasion of Mahashivratri, I was blessed to have darshan of Lord Mahadeva (Shankara) in a village near Bengaluru (Bangalore) city in the state of Karnataka.
There was a 112 feet tall statue of Mahadeva, the above photo is of the same statue.
My mind was stunned while looking at it even from a distance and when I got up close, I was overwhelmed by the huge Patangana (open ground), the chanting of Lord's name by the people present there, the energy and the excited atmosphere.
Awaited for a while, a thought came to my mind that what would be the reason for building such a big statue ??
And after thinking for a moment I found my answer.
We are not attracted to something until we see it, or we pay attention to something only untill it is seen.
This statue is tall and easily visible even from a distance, so anyone can be instantly attracted to it.
Also, no matter how crowded the place is, the easily visible statue and its atmosphere make us fully present by mind and body.
The reason "religious places should be included in the trip" I said is that they are the most crowded places. There is the most movement of people, so we get in touch with many people, communicate and exchange thoughts, get information through conversation which enhances thinking ability and knowledge.
Mantras/chanting of God's name produces sound waves and vibrations in the atmosphere which directly hit our heart and brain.
Due to this, the blood flow becomes smooth, dynamic and the thinking power becomes profound.
Also, the energy getting circulated in the body due to the environment destroys all the harmful things in the mind such as negative thoughts, stress, anxiety.
This automatically pures the mind and increases the freshness, enthusiasm and aggressiveness needed to work.
Eventually everything improves, becomes easier and enhances success.
I like traveling to different places, meeting new people because of all these things.
You can say it is in my blood, it is difficult to live without it!
That is why it is my firm belief and I always say,
Everyone should travel frequently,
Visit at least one religious place
And
Get rich with thoughts and reach the path of social, mental and financial progress ...!!
💫💫💫💫💫💫💫
👉 When we are passionate about something, like minded people meet us and a new and beautiful journey begins.
Me and all of my colleagues are always together for the same reason, learn new things and developing, growing ourselves.
👉 You too can learn from us many things that benefit us in daily life as well as business growth.
For that, register yourself by visiting the group link given below and learn new things 👇
Thank you ...✌😇
7 comments
Thanks for putting up a different perspective for including a spiritual place in my travel itinerary. I will implement this and share my experiences with you. Thank you!
Traveling makes a person rich (provided, he interacts with people while traveling).
ye bohot sahi laga muje...nice one Makarand...keep writing...👍👍👍
Nice thought....
👍
धार्मिक स्थळी जाऊन फक्त देवाचे दर्शनच नाही तर अनुभूती घेता येते, हे छान दाखवून दिलस!
खूपच छान विचार
Very TRUE khup Chan Vichar ahe kharach apan dharmik sthalana bhet delech pahijey
छान ब्लॉग....
Travelling opens our Mind and specially spiritual places bring a transformation in our lives... I have experienced this personally 🤝😊
Post a Comment