गुरु / GURU !!
प्रत्येकाने जीवनात किमान एकदा तरी वाचावा असा ग्रंथ -
" श्रीगुरुचरित्र !!"
दत्त हे एकमेव असे दैवत्व आहे ज्यांना "गुरुदेव" म्हटले जाते.
त्यांचे माता-पिता यांना असा आशीर्वाद मिळाला होता की, त्यांच्या पोटी असा पुत्र जन्मास येईल जो सर्व देवांचा गुरु असेल.
तो मानवातील अहंकार रुपी राक्षस दूर करुन त्यांचे मन शांत, स्वच्छ आणि ऊर्जित करेल व त्यांच्यावर कायम कृपावृष्टी करेल.
सर्वच जण सामान्य म्हणून जन्मास येतात.
परंतु कुठलाही सामान्य माणूस हा गुरुच्या कृपेमुळे असामान्य, अद्वितीय होतो.
जी लोकं यशाची शिखरे गाठतात, त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर त्यांनी किमान एक गुरु केलेला दिसतो.
मग गुरु कोणताही असू शकतो जसे की,
मूल्ये, वेळ, निष्ठा, समर्पण, सदसद्विवेक, वैराग्य वगैरे…
सर्वांत उपयुक्त म्हणायला गेल्यास कुणी एक 'व्यक्ती गुरु असणे !' कारण गुरु सजीव असल्यास त्याच्यासोबत विचारविनिमय करता येतो. त्यामुळे विविध मार्ग चटकन सापडतात कारण त्याने सर्व अनुभवलेले असते.
श्रीदत्त हे स्वतः "गुरु" असूनही त्यांचे स्वतःचे २४ गुरु आहेत आणि येथे मनुष्याला त्याचा अहंकार प्रचंड प्रिय, त्यामुळे 'मला गुरुची काय गरज ?' ह्या भ्रमात तो राहतो.
दत्तांच्या शिकवणीतील सर्वात महत्त्वपूर्ण तत्त्व म्हणजे 'कृतज्ञता!'
जी गुरुपदेशाची प्रथम पायरी म्हणता येते.
श्रीदत्तांच्या आरती मधे याच कारणास्तव अशी ओळ आहे,
"मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ॥"
या ठिकाणी अर्थ असा की,
अहंकार, मत्सर बाजूला ठेवून, एकाग्र चित्ताने कार्य केल्यास दिव्यत्वाची अर्थात भरभराटीची प्रचिती शीघ्र येते.
त्याप्रमाणेच असेही म्हणता येऊ शकते की,
"मी" बाजूला सारुन "आम्ही"चा उपयोग केला तर कार्यसिद्धी अगदीच सोपी होऊन जाते कारण "मी"पणा, मत्सर (माझी सर कुणालाच नाही - माझ्यासारखा कुणीच नाही) रुपी राक्षसाचा वध होऊन मानव कृतज्ञ होतो.
पाय जितके जमिनीत रुततात, यश तितकीच उंची गाठते !!
प्रत्येक व्यक्तीमधे देवाने काहीतरी विशेष दिलेले आहे जे दुसर्या कुणाकडे नाही. जर त्याच गोष्टीसाठी आपण एखाद्याकडे शिकण्याची मागणी केली तर, त्याला गुरु केले तर …!!
गुरुविण नोहे साध्य जीवन
गुरुकृपेसाठी हवे पूर्ण समर्पण !!
💫💫💫💫💫💫💫
पुस्तके, ग्रंथ, कादंबरी हे सध्याच्या काळातील सर्वोत्तम गुरु.
ज्ञान, सारासार वैचारिक पात्रता, कौशल्य विकास अशा अनेक गोष्टी त्यातूनच अंगीकारल्या जाऊ शकतात.
अशा सर्व गोष्टी जाणून, मनन करुन त्यांचा जीवनात उपयोग करुन घेतल्यास जगण्यात सहजता येते हा आम्हा सर्वांचा ठाम विश्वास आणि अनुभव आहे.
तुम्हीही ते नक्कीच करु शकता.
खालील संकेतस्थळावर भेट द्या व त्याची सुंदर अनुभूती घ्या 👇
धन्यवाद..😇
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GURU !!
A holybook that everyone should read at least once in their life -
"Shri Guru Charitra !!"
Datta is the only deity known as "Gurudeva".
His parents were blessed that a son would be born to them who would be the Guru/master/guide of all the gods.
He will remove the demon of ego in human beings and make their minds calm, clean and energized and shower them with eternal grace.
Everyone is born normal.
But any ordinary person becomes extraordinary, unique by the grace of Guru.
If you study the lives of people who reach the pinnacle of success, you will find that they have at least one Guru.
Guru can be any such as,
Ethics, Time, Loyalty, Dedication, Consciousness, Dispassion etc...
If you go to say the most useful, someone is a 'human Guru!' Because if there is a living Guru, one can discuss with him. So different ways are quickly found because he has experienced them all.
Even though Sridatta is the "Guru" himself, he has his own 24 Gurus, and here man is very fond of his ego, so 'What need do I have of a Guru?' He lives in this attitude.
The most important principle in Sridatta's teaching is 'Gratitude!'
Which can be called the first step of Guru-upadesha (preaching).
It is for this reason that Sridatta's hollering contains the line which has a meaning that,
Keeping aside ego, jealousy, spite and working with a concentrated mind, the realization of divinity i.e. prosperity comes quickly.
Similarly, it can also be said that,
If "I" is set aside and "we" is used, the accomplishments become very easy because the demon of "I"ness, jealousy, spite (There is no one like me) is slain and the human becomes grateful.
The more the feet are grounded,
the higher the success !!
God has given something special in every person that no one else has. If for the same we seek to learn from someone, if we make him Guru...!!
No accomplishment without Guru
Need dedication for grace of Guru !!
💫💫💫💫💫💫💫
Books, texts, novels are the best gurus of the present time.
Many things like knowledge, overall conceptual qualification, skill development can be adopted from it.
It is our firm belief and experience that knowing all such things, meditating and applying them in life makes life easier.
You can definitely do it too.
Visit the following website and experience its beauty 👇
Thank you...😇
13 comments
अगाध सत्य.
गुरुदेव..🙏
🙏🙏🙏Very nice
तीन शिरे सहा हात। तया माझा दंडवत.
उत्कृष्ट मांडणी केली आहे मकरंद.
मी आफळे बुवांच्या कीर्तनात एक गोष्ट ऐकली होती ती हा ब्लॉग वाचून मला आठवली.
"मी" ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी |
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ||
ह्या मधल्या पहिल्या ओळीत मी ऐवजी आम्ही हा शब्द खूप छान वाटतो.
"आम्ही" ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी |
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ||
असेच छान ब्लॉग्स लिहत रहा. पुढच्या ब्लॉग ची वाट बघतो आहे मी.
छान माहिती !!👌🙏
Kharach ekda tari wachava pratyekane.
Jay Gurudev
Far chan mahiti a.....
Gurucharitrache vachan ani guru bhakti hi kalachi garaj aahe.
Apan sada sarvada Dattasevet lin rahane hech shreyaskar.
गुरू हे एक तत्व आहे, त्याबद्दल खरच खूप सुंदर लिहिलस, असेच सुंदर लिखाण तुझ्याकडून सतत होवो हाच आशीर्वाद.
अतीशय सुंदर परीक्षण �� असेच ब्लॉग लिहून घेतील दत्तात्रय तुझ्याकडून !
Gurunchi krupa zalyavr
सारे सात्विक भाव उमलती, हळुहळु सरते *मी* पण माझे...
Ani man pavitra hote..
Chhan blog...👍🏻
गुरुकृपे साधियेला मी आज सुपंथ..🙏
खूपच सुंदर...
Fantastic Mak !!
खूप sunder mahiti asch likhan Kara ke ambala ajun mahiti
milel 👏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. फारच अप्रतिम मनु.
Post a Comment