५२ दिवसांचे वर्ष / 52 days a year !!
५२ दिवसांचे एक वर्ष !!
"पुढे जाऊन आपण बिझनेस करु!" ह्या वाक्याशी खूप लोक संबंधित असतील.
विद्यार्थी, खेळाडू, कला जोपासणाऱ्या आणि खास करुन नोकरी करणार्या अशा माझ्या वयाच्या ते साधारण पंचेचाळीशीतल्या जवळ जवळ सर्व लोकांकडून मी हे वाक्य ऐकलेलं आहे.
असं नाही की सगळेच त्यासारखा विचार करतात, काही लोक त्यांच्या आयुष्यात, आहेत त्या परिस्थितीत सुद्धा सुखी असतात.
मध्यंतरी माझी एका अष्टपैलू अशा यशस्वी उद्योजकांशी भेट झाली होती. त्यांचा अनुभव खूप दांडगा होता.
त्यांना बरेच परिश्रम करावे लागले होते, प्रचंड कष्टांनंतर यश मिळाले होते, आणि ते ही त्यांच्या कष्टाच्या कित्येक पट जास्त.
मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की,
बहुतांशी जणांना स्वतःचा बिझनेस करण्याची ईच्छा असते पण ते त्यात यश मिळवू शकत नाहीत, असे का...?
तेव्हा त्यांनी अतिशय सुंदर विचार मांडले.
ते असे,
नोकरी करणार्यांना माहिती असतं की नोकरी करुन आपल्याला जशी जीवनशैली हवी आहे, तशी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे व्यवसाय करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे असा त्यांचा ग्रह असतो. त्या अनुषंगाने ते विचार करुन अभ्यासही करतात.
पण ९५% लोक त्यात पुढे जात नाहीत.
इथे मुद्दा हा आहे की चौकटीच्या बाहेर येऊन हाल-चाल, कृती करण्याचा, पावले उचलण्याचा.
जिथे आहोत त्याच ठिकाणी उभे राहून दुसरीकडे कसे जाता येईल..?
वर्षातील एकूण दिवस ३६५ (लीप ३६६).
सरासरीनुसार, प्रत्येक जण हा आठवड्यातील ६ दिवस काम करतो (सार्वजनिक, धार्मिक सुट्या वगळता).
दर आठवड्याला एक दिवस सुटी, म्हणजेच पूर्ण वर्षभरात फक्त ५२ दिवस माणूस स्वतंत्र असतो.
अर्थात - ५२ दिवसांचे एक वर्ष !!
अशी कित्येक वर्षे, इतर दिवस कामे व उरलेले ५२ दिवस बिझनेस सुरु करण्याच्या विचारातच निघून जातात.
मराठीमधे एक म्हण आहे -
गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी ।
आणि म्हणायचा ह्या जागेवर बांधीन मी एक माडी ।।
तिचा अर्थ असा की -
गणपत नावाचा एक वाणी, विडी ओढल्यासारखी काडी चावत एका जागेसमोर उभा रहायचा आणि मी एक दिवस ह्या जागेवर मोठं घर बांधेन असं कायम म्हणायचा.
पण त्यानंतर त्यादृष्टीने पुढे काहीच हालचाल करायचा नाही, मग ती माडी कशी बांधून होणार..!!
व्यवसाय किंवा उत्पन्नाचे दुसरे साधन निर्माण करण्यासाठी बरेच मार्ग उपलब्ध आहेत.
पण जोपर्यंत त्यासाठी कृती केली जात नाही तोपर्यंत परिणाम दिसू शकत नाही.
इतरांनी कितीही सांगितलं तरी स्वतः पाण्यात उतरल्याशिवाय त्याची खोली, घनता समजत नाही त्याप्रमाणेच व्यवसाय स्वतः करुन पहावा लागतो, त्यासाठी व्यक्तिशः मैदानात उतरावे लागते, मग तो व्यवसाय कुठल्याही क्षेत्रातील असो.
जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या प्राथमिक उत्पन्नाच्या स्रोतावर काम करत करत दुसऱ्या स्रोतावर समांतरपणे काम करते आणि पहिल्या स्रोतापेक्षा दुसऱ्या स्रोताद्वारे जास्त उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर प्राथमिक स्रोत सोडते, हे त्या व्यक्तीचे खरे स्वातंत्र्य म्हणता येईल !!
थोडक्यात,
एका कल्पनेवर किमान तीन ते चार वर्ष कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता काम केल्यास, काही दिवसांनी अशी परिस्थिती येऊ शकते की,
वर्षाचे ५२ दिवस काम
आणि नंतर आरामच आराम..!!
💫💫💫💫💫
👉 आमचा कार्यसंघ समान विचार आणि नीतिमत्तेवर काम करतो.
म्हणूनच आम्ही विविध क्षेत्रांबद्दल ज्ञान मिळवू शकतो, व्यवसाय करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करु शकतो आणि एकत्र राहून दररोज आनंद घेऊ शकतो.
तुम्हीसुद्धा आमच्यासोबत जोडले जाऊ शकता, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन -
👉व्हाॅट्सॲप :
👉 टेलिग्राम :
😃😃😃
---------------------------------------------------------- X ----------------------------------------------------------
52 days a year!
"We will do business in the future!" Many people will relate to this sentence.
I have heard this phrase from almost everyone like students, sportsmen, artists and especially working people from my age to about forty-five.
Everyone doesn't think like that. Some people stay happy in their life, in whatever situation they are in.
In the meantime, I met a successful businessman who was versatile. His experience was great.
He had to work hard, achieved success after great hardships, and it was many times more than his hard work.
I had asked him a question,
Most of people want to start their own business but they can't, why...?
Then he presented very beautiful thoughts.
He said,
Jobby people, employees know that the chances of getting the lifestyle they want by working on a job are very low. Hence they believe that the best way is to do business. Though they think and study accordingly, 95% of people don't go ahead with it.
The point here is to move outside the box, act, and take the necessary steps.
How can we go somewhere else by standing where we are..?
Total days in a year are 365 (Leap 366).
On average, everyone works 6 days a week (excluding public, and religious holidays).
One day off per week i.e. a person is free only 52 days in a full year.
Simply put, life is - 52 days a year !!
Other days get spent working and the remaining 52 days thinking about starting a business. Many years pass like this.
There is a saying in Marathi,
Ganapat wani used to bite a stick
while smoking a cigarette!
And used to say on this place
I will build mansion a great !!
This means that -
A man named Ganapat used to stand in front of a place while biting a stick like a cigarette and keep saying that one day I will build a big house on this place.
But after that, he does not want to make any further move, then how will that mansion be built..!!
There are many ways to create a business or another source of income.
But unless action is taken, the result cannot be seen.
No matter what others tell you, you cannot understand its depth and density unless you get into the water yourself. You have to try the business yourself, for that you have to "enter the battlefield" personally, regardless of the field of business.
The real independence for an individual is when he works parallelly on a second income source while working on the primary and leaving his primary source after earning more income through the second source than the first one.
In short,
If an idea is worked on for at least three to four years without any expectation of returns, after a few days it may happen that,
Work 52 days a year
And then only cheer..!!
💫💫💫💫💫
👉 Our team works on the same thoughts and ethics.
That is why we are able to gain knowledge about different areas, use various techniques to do business, and enjoy every day together.
You can connect us on -
👉 WhatsApp :
👉 Telegram :
😃😃😃
4 comments
Such a motivational post👏🏻 lets try to live all 365 days rathwr than 52
मी तर खूप साऱ्या गणपत वाण्यांना ओळखतो जे खूप वर्षा पासून माडी बांधणार म्हणत आहेत.हा.हा..
कमाल लिहिला आहेस मक्या. Keep it up. All the best.
छान लिहिलंय, ज्यांना Businesses करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. Keep it up.
Very motivational blog & great writing...!!!👍🏻👍🏻👍🏻
Post a Comment