अज्ञान दिल्याने कमी होते / Nescience decreases after sharing !!
अज्ञान दिल्याने कमी होते !!
शीर्षक वाचून तुमच्या मनाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की,
'ज्ञान दिल्याने वाढते' हे बरोबर आहे पण 'अज्ञान दिल्याने कमी होते' हे कसे ..?
एक शाश्वत सत्य सर्वांना माहित आहे की -
ज्ञान हीच परम संपत्ती आहे.
कोणतीही व्यक्ती ही तिच्याकडे असलेल्या ज्ञानामुळेच ओळखली जाते.
पण जर ज्ञान नसेल तर ते मिळवावे कसे ?
त्याचे उत्तर म्हणजे -
ज्ञान आत्मसात करण्याची त्रिसूत्री - वाचन, मनन, लेखन.
आपण काय वाचतो हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
त्यानंतर काय आणि कसा विचार करतो ह्यावर ठरते की ते आपल्याला कितपत लक्षात राहील.
आणि ते लक्षात ठेऊन विचार करता करता आपल्याला सुंदर गोष्टी सुचतात, ज्या आपण लिहून काढल्या तर एक भन्नाट असा उपयुक्त शोध लेख तयार होतो.
पण आता मुख्य मुद्दा हा की, हे आपल्याला सांगणार, शिकवणार, मार्गदर्शन करणार कोण ?
एखाद्या विषयाबद्दल माहिती असेल तर आपण त्यावर भरभरुन बोलू शकतो पण जर माहिती नसेल तर आपले अज्ञान समोर येते.
इथे अनेक लोक अडचणीत सापडतात.
कारण, आपल्याला माहित असेल तर गर्व होतो आणि नसेल तर कमीपणा वाटतो.
कमीपणा न दाखवणे हाच एक मोठेपणा आहे.
माहित असेल तर गर्व अजिबात करु नये, उलट त्याबद्दल कृतज्ञ रहावे.
परंतु,
जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही तेव्हा त्याबद्दल कमीपणा न वाटून घेता, अतिशय स्वच्छ मनाने व सकारात्मक विचाराने त्याबद्दल विचारणे हा ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
मदत मागणे हे एक अनोखे कौशल्य आहे.
त्यासाठी प्रचंड धैर्य लागते.
याठिकाणी, तुम्ही त्याबाबत कुणाला विचारता, हे अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावते.
ज्ञानाची अपेक्षा ठेवणारी व्यक्ती ही कायमच मनाचा कमीपणा बाजूला ठेवते आणि म्हणूनच ती यशस्वी होते.
ह्यामुळेच ज्ञानाची अपेक्षा ही जाणकार आणि माहितगार व्यक्तीकडूनच केली जाते.
ज्ञान मिळवणे ही अतिशय सोपी गोष्ट आहे फक्त आपण ती साध्यासरळ पद्धतीने घेण्याची तयारी दाखवली पाहिजे.
💫💫💫💫💫💫💫
ह्या लेखाचे वाचन तर तुम्ही केलेच आहे. त्याचे मनन करुन तुमचे विचार लिहून काढले तर तुम्हीही एक छानसा लेख तयार करु शकता.
अशाच प्रकारे ज्ञानाची त्रिसूत्री आम्ही स्वतः साध्य करतो आणि जोपासतो.
तुम्हीही ह्या पद्धतीचा अवलंब करुन ज्ञान व त्यातून यश साध्य करु शकता.
खालील समूहाच्या संकेतस्थळावर जाऊन आमच्या संपर्कात राहू शकता व अशाच नवनवीन संकल्पना जाणून घेऊ शकता 👇
धन्यवाद ... 😁
----------------------------------------------------------------------------------------------------
Nescience decreases after sharing !!
After reading the title, a question must have been raised in your mind that
'Knowledge increases by sharing' is very true but how does 'Nescience decrease after sharing ??'
An eternal truth known to all is –
Knowledge is the ultimate wealth.
Any person is known only by the knowledge he possesses.
But if there is no knowledge, how to get it ?
The answer is -
The trinity of acquiring knowledge - Reading, Reminding, Writing.
What we read is very important.
Afterwards, what and how we think results in how much we will remember it.
Then remembering and thinking about it suggests meaningful content that, if written down, makes for a wonderfully useful research article.
But now the main point is that, who will tell us, teach us, guide us ?
If we know about a topic, we can talk a lot about it, but if we don't know, our nescience comes to the fore.
Many people get into trouble here.
Because, if we know, we feel conceited and if we don't, we feel deficient.
It is magnanimity not to show deficiency.
If we know, we should not be conceited at all, but be grateful for it.
But,
when we don't know something, asking about it with a very pure mind and positive approach is the best way to gain knowledge.
Asking for help is a unique skill.
It takes a lot of courage.
Here, who we ask about it plays a very vital and crucial role.
A person who aspires to knowledge always puts aside the deficiencies of the mind and thus becomes successful. Because of this, knowledge is expected only from knowledgeable and informative people.
Acquiring knowledge is a very easy thing, we just have to be willing to take it in the simplest way.
💫💫💫💫💫💫💫
You have already read this article.
If you meditate on it and write down your thoughts, you can also create a nice article.
In this way, we ourselves attain and cultivate the trinity of knowledge. You too can achieve knowledge and then success by following this method.
You can stay in touch with us and learn about such new, unique concepts by joining the following group's link 👇
Thank you ... 😁
1 comment
Correct .....
I actually forgot all this things in my busy life schedule but your blogs always help me to remember such things.
Nice blog Mak. Keep it up bro.
Post a Comment