Updates

Be Nobody !!

 



Be Nobody !!



A short blog...😁



काही दिवसांपूर्वी मला एक मित्र भेटला. बऱ्याच दिवसांनंतर आमची भेट झाली.
खूप छान वाटलं. 


कारण… 

पूर्वी आम्ही एकमेकांना वारंवार भेटायचो त्यावेळी तो शिक्षण व नोकरीत STRUGGLE करत होता.
जेव्हा आमचा PHONE व्हायचा तेव्हा दर वेळेस तो म्हणायचा की, 
"काहीच PERFECT होत नाहीये रे !" 

आणि मी त्याचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचो, कारण तो त्याच्या मनात साठलेल्या भावना, विचार बाहेर काढून मन मोकळं करायचा. 

ह्या आधी शेवटचं जेव्हा आम्ही भेटलो तेव्हाही तो हेच म्हणाला होता.
तेव्हा मला रहावलं नाही आणि मी त्याला सांगितलं की,
"जगात कुणीच परिपूर्ण/PERFECT नाही आणि कुणी नसावे सुद्धा…!!"

So, 

Nobody is perfect
Be Nobody !!


आता जेव्हा आम्ही भेटलो, मला वेगळाच 'तो' अनुभवायला मिळाला.
तो :

"मित्रा, तू मला त्यादिवशी जे सांगितलंस त्यामुळे माझं आयुष्यच बदललं.
तुझ्या बोलण्यावर मी खूप विचार केला आणि खूप गोष्टी जाणवल्या. 

मी PERFECT होण्याकडे अती लक्ष देत होतो आणि त्यातच अडकून पडायचो. म्हणूनच मला इतर गोष्टी सुचत नव्हत्या, स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. बऱ्याच गोष्टी मागे राहून जात होत्या आणि त्यामुळे आयुष्याची मजा घेणे राहून जायचे.
पण तसं करणं आता मी खूप कमी केलंय आणि जगण्याची खरी मजा अनुभवतोय." 


जगात कुणीही परिपूर्ण नाही आणि जर असतं तर त्याच्या आयुष्यात काहीच अर्थ राहिला नसता. 

एखाद्याकडे जर भरपूर पैसा असता तर तो हवी असलेली गोष्ट अगदी चटकन घेऊ शकला असता.
परंतु, 
त्याला पैसा कमावून PROPER PLANNING करुन खर्च करण्याची मजा घेता आली नसती..! 

एखाद्याकडे सर्व ज्ञान असतं तर त्याला इतर काहीच करण्याची गरज पडली नसती.
परंतु, 
नवीन गोष्ट शिकल्यानंतरचे समाधान त्याला कधीच मिळाले नसते..! 

एखाद्याला सर्वच वाद्य वाजवता आली असती तर त्याला 
नवीन ताल, नवीन लय, नवे स्वर, छान संगीत अनुभवता आले नसते..! 

एखाद्याला सर्वच खेळ खेळता आले असते तर तो 
एकही खेळ नीट खेळू शकला नसता..! 


थोडक्यात, 
जे नैसर्गिकरित्या आपल्याकडे आहे तेच उत्तम आहे.
निसर्ग हाच सर्वात PERFECT आहे. 

मी तर म्हणेन,
परिपूर्ण होण्यापेक्षा "UP TO THE MARK" होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

तसे केल्यास 
Everyone can go from NOBODY to SOMEBODY. 


जगातील यशस्वी लोक कधीच PERFECT होण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते फक्त कालच्यापेक्षा आज १% जास्त UP TO THE MARK देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ते
From NOBODY to SOMEBODY for EVERYBODY 
हा प्रवास उत्तमरित्या करतात. 


In a nutshell, 
आयुष्याची मजा ही PERFECT नसण्यातंच जास्त आहे 
आणि ती प्रत्येकाने तशीच घ्यावी.

💫💫💫💫💫💫💫💫💫


👉 समविचारी लोकांसोबत राहिल्याने प्रगतीचा आलेख चढता राहतो.
नवनवीन विचारांना वाचा फुटते आणि यशाचे मार्ग विस्तारत जातात. 

👉 आम्ही सर्व जण एकत्र येऊन अनेकविध गोष्टींसह स्वतःच्या सुधारणेसाठी कायम प्रयत्न करत असतो.
एकत्रित होऊन काम करण्याचा फायदा असा की, आमचे ज्ञान दिल्याने इतरांना नव्या कल्पना सुचतात व इतरांच्या विचारांमुळे आमच्या कामात त्यासंबंधित आणखी गोष्टी आम्हाला अंमलात आणता येतात. 

👉 सशुल्क गोष्टी महत्त्वपूर्ण असतातच पण मोफत गोष्टींचा फायदा नक्कीच उचलायला हवा.
बर्‍याचशा गोष्टी आपल्या आसपासच असतात, फक्त त्याकडे लक्ष द्यायला हवे. 

खालील लिंकला अवश्य भेट द्या, नवीन कल्पना, विविध विचार जाणून घ्या, भरपूर माहिती मिळवा आणि सेवांचा लाभ घ्या. 




धन्यवाद/Thank you...🙏😇

7 comments

Radha said...

Your imperfections makes you unique and special 💫

Shripad joshi said...

Very nice Makrand.

Unknown said...

Will definitely try to be "up to the mark!"

Unknown said...

Nice article

Unknown said...

Nice one

S.D.K. said...

Excellent!

Aishwarya said...

Good one👍