७ चक्र मानवाचे तसेच बिझनेसचे !
लहानपणी घरातली थोर-मोठी मंडळी, आजी-आजोबा नेहमी सांगायचे, “देवाला नमस्कार कर आणि सांग की मला चांगली बुद्धी दे, तो ऐकतो.” वय आणि समज दोन्ही कमी असल्यामुळे तेव्हा काही कळत नव्हते.
जसजसा मोठा होत गेलो, जाणकार लोकांसोबत उठणे-बसणे होत गेले तसे उमगत गेले की अध्यात्म हे जगातील सर्वात मोठे शाश्वत सत्य आहे. आध्यात्मिकता अर्थात Spirituality. ह्यास आपण “आत्मिकता” असेही म्हणू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ह्या बिझनेसशी संबंधित ब्लॉगमधे आत्मिकता मधेच कुठून आली ??
तर ह्याचा संदर्भ असा की,
अध्यात्माचा अर्थ म्हणजे – स्वतःचा शोध, आपल्यातील अजात शक्तीचा शोध. पृथ्वीतलावरील मनुष्य प्राणी हा कायम भौतिक, ऐहिक, शारीरिक, आर्थिक सुखामागे पळत असतो परंतु आंतरिक सुखाकडे कुणी बघत नाही/लक्ष देत नाही. कारण तुलनात्मक रित्या ते मिळवणे अवघड असते, आणि हो, कुणी मान्य करतील कुणी नाही, बिझनेस म्हणजे सुद्धा स्वतःचा शोधच.
जे यशस्वी (successful) लोक आहेत, त्यांचे विचार, त्यांचे काम, त्यांची success story ह्या गोष्टी मी जेव्हा नजरेखालून घातल्या तेव्हा त्यात मला एक गोष्ट समान (common) आढळली ती म्हणजे त्या गोष्टीशी त्यांची असलेली “आत्मिक जोड” (spiritual/inner connection).
थोर संत, महात्मे, दैवी शक्ती असणारे लोक कायम म्हणतात की परमात्म्याला शरण जा, थोडक्यात त्याला surrender व्हा, कल्पनेतही कधी विचार केला नसेल अशा सुखाची प्राप्ती तुम्हाला होईल…परंतु ईश्वराने केलेली ही मांडणी आहे. सर्वांनाच जर त्याची प्राप्ती झाली तर सगळेच सुखी होतील आणि तसे झाले तर जग कसे चालेल..!! त्यामुळेच सर्वांनाच ते मिळवता येत नाही..
कुठलाच माणूस ह्या जगात पूर्णतः सुखी नाही कारण तो नेहमी हेच म्हणतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही…
पण मी जितका बिझनेस पहिला आहे त्यामध्ये प्रयत्न करतो त्याला हवी असलेली गोष्ट मिळते आणि त्या प्रयत्नांना आत्मिक/आध्यात्मिक जोड लाभली तर ती गोष्ट मिळते म्हणजे मिळतेच…ध्येय साध्य करण्यासाठी अंतर्मनापासून प्रयत्न केले तर ते नक्कीच सफल होतात.
आपले शरीर (body) आणि आत्मा (soul) हे बाह्यनिसर्गाचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या आतही एक शक्ती आहे जी ह्या सगळ्याची जाणीव करुन देत असते. तुम्हाला त्याच शक्तीबद्दल सांगणार आहे जी आपल्या मध्ये आहे. खरं तर याच शक्तीने आपण बनलो आहोत पण तिचा आपण व्यावहारिक दृष्टिने विचारच केला नसावा. ती शक्ती म्हणजे "मानवी सप्तचक्र."
मी सहज सप्तचक्रांचा विचार उद्योजकतेच्या अनुषंगाने केला (business point of view) तर मला ह्या गोष्ट सहज उलगडत गेल्या, अर्थात माझा homework खूपच चांगला होता. खास वाचकांसाठी आपल्या ७ चक्रांचा उद्योजकतेच्या अनुषंगाने केलेला उलगडा.
आपल्या शरीरात सात चक्र आहेत :
1. मूलाधार (root chakra)
- हे आपल्या चेतारज्जू अर्थात vertebral column (spine) च्या सर्वात शेवटच्या हाडाशी असते.
- ते आपल्या शरीराचा पाया (base) च्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे.
बिझनेस बाबतीत विचार केल्यास जितके आपले “ज्ञान” पक्के तितका आपला बिझनेस मजबूत होतो, आपण grounded राहतो. तर आजच तुमच्या रूट चक्रावर काम सुरु करा.
2. स्वाधिष्ठान (sacrel chakra)
- हे आपल्या ओटीपोटाच्या (पोटाच्या खाली लैंगिक भागापर्यंत) असते.
- आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण, creative nature ह्यामुळे होते.
बिझनेस बाबतीत विचार केल्यास आपली कार्यक्षमता (consistency) , कल्पकता (creativity) जितकी चांगली तितका बिझनेस वाढतो, मोठा होतो. तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये तुम्ही काल जसे होते त्या पेक्षा creative आहात का?
3. मणिपुरा (solar plaxes chakra)
- हे आपल्या नाभीच्या (bellybutton, navel) भागात असते.
- ते आपल्या शरीराचे स्वास्थ्य आणि कार्य नियंत्रित करते.
बिझनेस बाबतीत विचार केल्यास जितकी आपल्या बिझनेस वरची मालकी (ownership) आणि नियंत्रण (control) चांगले, तितका तो दूरपर्यंत टिकून राहतो. तुमच्या owner’SHIP’ चे captain तुम्ही असल्यावर कसलीच काळजी नाही.
4. अनाहत (heart chakra)
- हे आपल्या हृदयाजवळच्या (heart) भागात असते.
- तिथे आपल्या आत्म्याचा वास असतो. ते आपल्यातील भावना (emotions), दयाळूपणा (kindness), कणव (compassion), ह्याचे केंद्रक (centre) आहे.
बिझनेस बाबतीत विचार केल्यास जितकी आपली नैतिकता (ethics), उद्देश (intention), मूल्ये (values) चांगली, तितका आपला बिझनेस हा विश्वासार्ह (credible, reliable) होतो.
5. विशुद्ध (throat chakra)
- हे आपल्या स्वरयंत्र, कंठ (vocal area) ह्याजवळ असते.
- ते आपला आवाज, वाणी, शरीरातील शुद्धता नियंत्रित करते. ते आपली अभिव्यक्ती (self expression) दर्शवते.
बिझनेस बाबतीत विचार केल्यास जितकी आपली वाणी चांगली, आपल्या वाणीतील सत्यता स्पष्ट (truthfulness, straight forwardness) तितके आपले संबंध (customer relationships) चांगले. बोलने से बात बनती हे.
6. अजना/आज्ञा (third eye chakra)
- हे आपल्या भुवयांच्या (eye brows) अर्थात दोन्ही डोळ्यांच्या मध्यावर असते.
- ते आपल्यातील चेतना, कल्पना, मानसिकता, अंतर्मनाची जाणीव नियंत्रित करते.
बिझनेस बाबतीत विचार केल्यास जितकी आपली दूरदृष्टी चांगली (vision), स्वप्न भक्कम (strong dream), तितका आपला बिझनेस दूरपर्यंत (longitivity) चालतो. म्हणतात ना बिझनेसमन हा २० वर्षांनंतरचेही जग बघतो.
7. सहस्रार (crown chakra)
- हे आपल्या मस्तकाच्या वरती असते.
- ते स्वतःचा वरचा विश्वास नियंत्रित करते, आपल्यास सर्वात उच्च आपणाशी (highest self) जोडते.
बिझनेस बाबतीत विचार केल्यास जितका आपला आत्मविश्वास (self confidence) चांगला, जितकी श्रद्धा (faith & belief) मजबूत, तितकी आपली आपल्यावरची आणि आपल्या बिझनेस वरची खात्री (conviction) वाढते.
थोडक्यात (In short)
1. मूलाधार (root chakra) – ज्ञान, पाया – knowledge, strong foundation
2. स्वाधिष्ठान (sacrel chakra) – कल्पकता – creativity, consistency
3. मणिपुरा (solar plexus chakra) – नियंत्रण – control, ownership
4. अनाहत (heart chakra) – भावना, नैतिकता – emotions, kindness, intent, ethics
5. विशुद्ध (throat chakra) – शुद्ध वाणी, सत्यता – truthfulness, customer relationships
6. अजना (third eye chakra) – दूरदृष्टी – vision, dream, longevity
7. सहस्रार (crown chakra) – आत्मजाणीव, आत्मविश्वास – self-association, belief, confidence
माझा एक मित्र मला नेहमी म्हणतो, “तू बिझनेसमधे नाही, तर बिझनेस तुझ्यामधे शिरलेला आहे.” कदाचित त्यामुळेच मला प्रत्येक ठिकाणी बिझनेस दिसतो. अगदी सप्तचक्रांमधे सुद्धा !!!😊
3 comments
👏🏻👏🏻Masterpiece
Great 😃
Nice💯
Post a Comment