Updates

मनाचं रिचार्ज !


मनाचं रिचार्ज !!

मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर आणि सतत कानाला मोबाईल असे रुटीन रोजचेच.

रविवार...निवांत, आरामाचा दिवस...
आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती.
सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज 'लो बॅटरी'..
चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते..
पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती.

अरे बापरे... काय करावं तेच सुचेना...!!

मोबाईल बंद.. त्यामुळे वैतागलो, रेस्टलेस झालो, दोनतीनदा फॅनकडे, लाईट आले का म्हणून पाहिले.
चकरा मारून कंटाळलो, नाईलाज म्हणून बसलो.

माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले, “चिडणार नसशील तर, एक विचारू?”
नाही चिडणार !!” .. हसत मी उत्तर दिलं.
मघापासून पाहतोय, मोबाईल बंद आणि चार्जिंग करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब आहेस. मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतो, त्याला इतकं जपतो.. मग दिवसभर वागणं-बोलणं, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं यासाठी सदासर्वकाळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केला का ??
त्या मनाच्या चार्जिंगचं काय..?”

सत्तर पावसाळे पाहिलेले वडील बोलत होते.

मनाचं चार्जिंग ?? हे काय नवीन...???” मी विचारलं.

नवीन नाही, जुनंच आहे. चार्जिंग, अपडेट हे तुमचे आजचे परवलीचे शब्द. प्रत्येकजण कपडे, राहणीमान, ॲप्स सतत चुकता अपडेट करत असतो. परंतु, रोजच्या जगण्याच्या धांदलीत या सगळ्यात दुर्लक्ष होतं, ते मनाकडे.”

भारी बाबा, इंट्रेस्टिंग बोलत आहात!” सहजपणे वडिलांच्या शेजारी बसलो.

लहान असताना बाबांची खूप सवय होती, सतत सोबत असायचो, त्यांची कॉपी करायचो. जसजसा मोठा होत गेलो तसं आमच्या दोघांत नकळत अंतर पडत गेलं. संवाद बंद झाला नाही, पण कमी मात्र झाला.
आई बाजूलाच बसलेली होती. आमचा होणारा संवाद तिला आनंद देत होता... त्यामुळे काही बोलता ती सगळं अनुभवत होती. कदाचित बघ्याच्या भूमिकेत तिला छान वाटत असावं.

धावपळीचं आयुष्य, टेन्शन यामुळे बाबा माझा मूड पाहून बोलत आणि आज खूप दिवासानंतर खरंतर वर्षांनंतर मी त्यांच्या शेजारी बसलो होतो. बाबा इमोशनल झाले हे त्यांच्या भरल्या डोळ्यातून समजलं.

मीच त्यांची पाठ थोपटली. त्यावेळी मलाही भरून आलं.
किती साधी गोष्ट !! पण ती सुद्धा इतक्या वर्षामध्ये मी केली नव्हती.
बाबांसोबत पुढचा तासभर गप्पा मारल्या.
एकदम फ्रेश, मस्त वाटलं.. !!

मनाचं चार्जिंग सुरु झालं बघ, तासाभरात मोबाईलची आठवण तरी झाली का.. लाईट केव्हाच आली..
आज बर्याच वर्षानंतर तुझ्याशी बोलल्यामुळे मी पण फुल्ल चार्ज झालो, दोस्ता..!!”

दोस्ता...” बाबा मला लहान असताना हाक मारायचे. आज खूप खूप वर्षांनी बाबांच्या तोंडून ऐकलं. बाबा आपल्या खोलीत गेले. मला भारी वाटत होतं.

काही वेळाने मनात आलं.. घर आवरु या..
बायकोला सांगितलं... ती आश्चर्याच्या सुखद धक्क्यात..  मला थांबायला सांगून ती घराबाहेर गेली आणि लगेच परत आली.

कसं शक्य आहे? आज सूर्य पूर्वेलाच उगवलाय..” बायकोचा टोमणा.

दोघंही मनापासून हसलो. अत्यंत उत्साहाने कामाला लागलो. सगळ्यात आधी कपाट आवरायला घेतलं. बॅग मध्ये भरून ठेवलेली कागदपत्रं चेक करताना शाळेत, कॉलेजमध्ये असतानाच्या डायऱ्या, वह्या सापडल्या. त्यातील जुने हिशोब, जपून ठेवलेली पेपरची कात्रणं पाहताना त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप वर्षांपूर्वी लिहुन ठेवलेल्या कविता वाचताना गंमत वाटली. विसरल्या गेलेल्या कॉलेजमधील काही खास व्यक्ती आठवल्या. आठवणींचा खजीना उघडत होता.

जुने फोटो अल्बम सापडले आणि मग काय..!!!
आजूबाजूला पसारा तसाच पडलेला आणि लहान मूल जसं खेळताना पसाऱ्यात बसून एखाद्या खेळण्यात हरवून जातं, अगदी तसंच जुने फोटो बघण्यात तसाच हरवून गेलो आणि मनाने त्याकाळात पोहचलो. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणीचे फोटो पाहताना मजा आली.

काही वेळ डोळे मिटुन शांत बसलो. विचार आले, 'कसं असतं ना आपलं मन..?
अचानक आनंदून जातं..
क्षणात गहिवरतं, हळवं होतं..
एका आयुष्यात किती आठवणी जमा होत असतात त्याची मोजणीच नाही. आठवणींचे वेगवेगळे फोल्डर सेव्ह असतात. ती फक्त ओपन/ क्लोज करता येतात.. डिलीट मात्र करता येत नाहीत!'

या विचारात असताना पाठीवर थोपटत आईने काॅफीचा कप हातात दिला. माझी अवस्था तिच्या बरोब्बर लक्षात आली.
वा..! आज एकदम रेट्रो मूड मध्ये..!!

रोज चुकता मोबाईलचं करतो, आज मनाचं चार्जिंग चालू आहे !”

आज खूप दिवसांनी तुला फ्रेश पाहिलं. अगदी खेळकर, स्वच्छंदी पूर्वी असायचास तसा. रागावू नकोस पण काम, स्टेटस, रिस्पॉन्सिबिलीटी वाढल्या तसा तू हरवत गेलास. त्यातच गुरफटलास.
एवढा की आमच्यासाठी तुझ्याकडे वेळच राहिला नाही. खूप मोठा झालास, पण आमच्यापासून लांब गेलास. उगीच वाद नको म्हणून आजवर बोलले नाही.. पण, आज पुन्हा पूर्वीचा वाटलास म्हणून हे बोलण्याचं धाडस केलं.”

थँक्यू सो मच..! इतरवेळी असं बोलल्यावर मी चिडलो असतो.. पण, आज नाही. आजचा दिवस मस्त आहे. करियर, स्टेटस, ॲम्बीशन हे सगळं सांभाळताना स्वतःसाठी जगणं विसरलो होतो.

आपण मोठे झालो की मन मारत राहतो.. त्याची इतकी सवय होते की आपली नेमकी आवड काय आहे हेच विसरतो . रुटीन सोडून आज खूप दिवासांनी काहीतरी वेगळं केलं. सगळ्यात महत्वाचं, कशाततरी हरवून गेलो. आज खूप हलकं वाटतंय.”

मग, मोबाईल ऑन करू की नको? कारण, कायम मोबाईलवर असणारा तू सकाळपासून एकदाही त्याला हात लावला नाहीस. खरंच आजचा दिवस मस्त आहे.”

चल, आता मी तुला किचनमध्ये मदत करतोबायकोला जोरात ठसका लागला.

मन जरा जास्तंच चार्ज झालं वाटतंय !!” बायकोने चिमटा काढलाच.

            🌹😅🌹😅🌹

मन खुश तर तब्येत खुश आणि तब्येत खुश तर आत्मा खुश...
मनाचं रिचार्ज दररोज झालंच पाहिजे.
लहानपणी आपल्याला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नसतं.
आपण बिनधास्त बागडत असतो, वाटेल तसं आणि वाटेल तेव्हा ..
तेव्हा आपलं मन पूर्णपणे चार्ज्ड असतं..
मोठं झाल्यावर आपणच आपल्यावर बंधनं घालून घेतो..
त्यामुळे स्वतःसाठी जगण्याचं सोडून जबाबदाऱ्यांसाठी जगायला लागतो...
ह्याचं मुख्य कारण म्हणजे आपण तशाच लोकांसोबत वावरतो ज्यांनी स्वतःला असं जखडून घेतलेलं असतं..
ना कसली मजा, ना कसली करमणूक..
फक्त आलेला दिवस ढकलायचा आणि किती दिवस राहिलेत म्हणत पगाराची वाट बघायची..
संगत है तो रंगत है अशी एक म्हण आहे...
त्याचा अर्थ वाईट आणि चांगलाही काढता येतो..
वाईट संगत असली तर आपणही तसेच होतो..
आणि चांगली संगत असली की आपण आयुष्याचा खरा आनंद लुटतो...कारण सर्व मनं फुल्लं चार्ज्ड, फ्रेश असतात.
चांगल्या संगतीमुळे आचार-विचार, राहणीमान, वागण्या-बोलण्याची पद्धत, स्वप्न, मानसिकता सर्वच गोष्टीत फरक पडतो.
जगातील सर्व यशस्वी लोक हे चांगली संगत आणि भक्कम असे प्रोत्साहन यामुळेच अव्वल आहेत.
यश तेव्हा मिळतं, जेव्हा कृती उत्तम असते,
कृती उत्तम तेव्हाच घडते जेव्हा विचार चांगले असतात
आणि विचार चांगले तेव्हाच येतात जेव्हा संगत उत्तम असते !!
चांगली संगत असेल तर जगही जिंकता येऊ शकते.

जर तुम्हीही जीवनातील प्रत्येक क्षणाची खरी मजा घेण्यास ईच्छुक असाल तर आमच्या सोबत सामील होऊ शकता आमच्या खालील वेबसाईटवर कनेक्ट होऊन...
https://www.mazavyapar.com/

ह्या वेबसाईट वर आम्ही बिझनेस आणि मार्केटिंग संबंधित ब्लॉग्स शेअर करत असतो आणि त्याचबरोबर अनेक उपक्रमही राबवत असतो.

तसेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आमच्या टेलिग्राम गृपचे सभासद होऊ शकता..


10 comments

Mukta said...

Khup mastaa 👏

Aishwarya Makarand said...

👏👏अप्रतिम

Dpk said...

Great one ...

Dilip said...

सुरेख..👍

Prashant Shouche said...

It's true 👍

Unknown said...

खूप च छान.
आज च्या पिढीची ही सत्य परिस्थिति आहे
रिचार्ज चे चित्र सुरेख.

Akshay said...

Nice one��

Bhagyashree Ghule said...

अप्रतिम...nice one💯💯💯💯💯👍🏻

Mak said...

Good

Aishwarya said...

Great 👍